advertisement

Mumbai Metro 9 : साठ मिनिटांचा प्रवास आता 30 मिनिटांत! मेट्रो 9 चा दुसरा टप्पा लवकरच, फडणवीसांची घोषणा

Last Updated:

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो 9 च्या उद्घाटनानंतर मुंबईच्या मेट्रो विस्ताराची माहिती दिली. मिरा-भाईंदर ते या ठिकाणी थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. यामुळे मुंबईचे सार्वजनिक परिवहन जाळे दिल्लीपेक्षाही मोठे होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आता दुसरा टप्पा आहे तो म्हणजे साईबाबा नगर ते सुभाष चंद्र नगर
आता दुसरा टप्पा आहे तो म्हणजे साईबाबा नगर ते सुभाष चंद्र नगर
मुंबई : आज मेट्रो 9 च्या दहिसर ते काशिगाव या पहिल्या टप्प्याचे यशस्वी उद्घाटन झाल्यानंतर फडणवीस यांनी मुंबई आणि मिरा-भाईंदर यांना जोडणाऱ्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्प्याबाबत एक मोठी घोषणा केली आहे. नेमका हा दुसरा टप्पा कोणत्या शहरातून असेल आणि कोणाला याचा विशेष फायदा होणार.
तासाभरांचा प्रवास आता किती वेळात होणार?
मिरा-भाईंदर ते मुंबई हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना साधारण एक तास लागतो मात्र आता या मेट्रोमुळे हा प्रवास आता अवघ्या 30 मिनिटांतच पूर्ण होणार आहे. फडणवीस यांनी पुढे सांगितले की,साईबाबा नगर ते सुभाष चंद्र नगर या दुसऱ्या टप्प्याचे साधारण 96 टक्के काम पूर्ण झाले असून याच वर्षी 4.3 किमीची ही मार्गिका प्रवाशांसाठी खुली होणार आहे.
advertisement
मेट्रो 7 आणि मेट्रो 3 ची जोडणी
या नव्या मेट्रो प्रकल्पाचे एक मोठी गोष्ट म्हणजे तिचे नेटवर्क, कारण ही मार्गिका आता मेट्रो 7 ला जोडली गेली आहे आणि पुढे ती मेट्रो 3 लाही अंडरग्राउंड जोडली जाणार आहे. त्यामुळे मिरा-भाईंदर शहरातील नागरिकांना आता थेट कुलाबा गाठता येणार आहे शिवाय वन कार्ड सेवेमुळे प्रवाशांना एकाच कार्डवर संपूर्ण मुंबईत प्रवास करता येणार आहे.
advertisement
ठाणे जिल्ह्यातून धावणारी ही पहिली मेट्रो असून ती पूर्णपणे हरित प्रकल्प म्हणून विकसित केलेली आहे. सौर ऊर्जा तसेच एलईडी लाइटिंगचा वापर यात करण्यात आलेला असून खास म्हणजे मेट्रो आणि उड्डाणपूल एकाच पिलरवर उभे करण्याचे आधुनिक असे तंत्रज्ञान येथे वापरण्यात आले आहे.येत्या 3 ते 4 वर्षांत मुंबईचे मेट्रो जाळे हे दिल्ली शहराच्या मेट्रो जाळ्यापेक्षा मोठे नक्की होईल आणि मुंबईकरांच्या सेवेत लवकरच वॉटर मेट्रो देखील येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
advertisement
ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाचा आज दिमाखात शुभारंभ
मुंबई शहरातील मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या प्रकल्पाचा शुभारंभ काही वेळात होणार आहे. हा प्रकल्प ठाणे आणि बोरिवली दुहेरी बोगदा असून यामुळे ठाणे आणि बोरिवली शहरातील अंतर कमी होणार आहे शिवाय ठाणे शहरातील घोडबंदर भागातीलही वाहतककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.
advertisement
प्रकल्पाची वैशिष्ट कोणती
या दुहेरी बोगद्या हा प्रकल्प साधारण 11.84 किमी लांबीचा असून त्यापैंकी 10.25 किमीचा मार्ग हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणारा असेल शिवाय या बोगद्यात दोन समांतर असे रस्ते बांधले जातील आणि हा बोगदा पूर्णपण जमिनीखालून जाणार असणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro 9 : साठ मिनिटांचा प्रवास आता 30 मिनिटांत! मेट्रो 9 चा दुसरा टप्पा लवकरच, फडणवीसांची घोषणा
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement