ऐन दिवाळीत 3 दिवस दरवाजा बंद, नवी मुंबईत एकाच कुंटुबातील 5 जण आढळले भयावह अवस्थेत, राज्याला हादरवणारी घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Navi Mumbai: नवी मुंबईच्या पनवेल तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका कुटुंबाने ऐन दिवाळीत टोकाचं पाऊल उचललं आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईच्या पनवेल तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका कुटुंबाने ऐन दिवाळीत टोकाचं पाऊल उचललं आहे. या कुटुंबातील पाच जण आपल्या राहत्या घरात भयावह अवस्थेत आढळले. ऐन दिवाळीत त्यांच्या घराचा दरवाजा तीन दिवस बंद होता. कुटुंबाची कसलीच हालचाल दिसत नव्हती. यामुळे आजुबाजुच्या लोकांना संशय आला. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करताच घरातील दृश्य पाहून पोलीसही हादरले.
नेमकी घटना काय?
पनवेल तालुक्यातील जावळे गावात एकाच कुटुंबातील पाच जणांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अन्य चार जणांवर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी उलवा पोलीस तपास करीत आहेत.
चहातून घेतलं विष
मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब मूळचं नेपाळचे असून ते जावळे गावात एका भाड्याच्या घरात राहत होते. या पाचही जणांनी चहामधून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक अहवालात निष्पन्न झाले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांच्या घराचे दार न उघडल्यामुळे अग्निशमन दल तसेच पोलिसांना माहिती दिली. सुरक्षा यंत्रणेच्या जवानांनी दार उघडताच पाचही जण शेजाऱ्यांनी बेशुद्धावस्थेत आढळले.
advertisement
ही घटना उघडकीस येताच त्यांना तातडीने उपचारासाठी पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र संतोष बिरा लुहार (२२) याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी तपासणीअंती सांगितलं. तर रमेश बिरा लुहार (२३), त्यांची पत्नी बसंती, मुलगा आयुष (५) आणि आर्यन (२) यांना उपचारासाठी नवी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघा लहान मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.
advertisement
आत्महत्येचं कारण अस्पष्ट
या पाचही जणांनी अशाप्रकारे टोकाचं पाऊल का उचललं? याची माहिती अद्याप समोर आली नाही. यातील चारही जण जोपर्यंत शुद्धीवर येत नाहीत. तोपर्यंत आत्महत्येचं नेमकं कारण काय? याची माहिती मिळू शकणार नाही. चारही जणांची प्रकृती स्थिर झाल्यावर आत्महत्येचं कारण समोर येईल, अशी माहिती उलवा पोलिसांनी दिली. पुढील तपास केला जात आहे.
view commentsLocation :
Navi Mumbai Panvel Raigarh,Raigad,Maharashtra
First Published :
October 24, 2025 7:41 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
ऐन दिवाळीत 3 दिवस दरवाजा बंद, नवी मुंबईत एकाच कुंटुबातील 5 जण आढळले भयावह अवस्थेत, राज्याला हादरवणारी घटना!


