Akshay Shinde Encounter : पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला? अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट!

Last Updated:

Badlapur School Akshay Shinde Encounter : न्या. दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगानेही पोलिसांना क्लीनचीट दिल्याने अक्षय शिंदेचं एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.

Akshay Shinde Encounter Case
Akshay Shinde Encounter Case
Akshay Shinde Encounter Case : मुंबईच्या बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र खवळून उठला होता. या प्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदे नावाच्या तरुणाला अटक केली होती. शाळेतल्या चिमुकल्यांवर अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येनं लोकांनी एकत्र येत, रेल रोको केला होता. नागरिकांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर बदलापूर प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असताना पोलिसांनी अक्षय शिंदेचं एन्काऊंटर केलं होतं. अशातच आता मोठी अपडेट समोर आली आहे.

 न्यायालयीन आयोगाकडून पोलिसांना क्लीनचीट

अक्षय शिंदेचं एन्काऊंटर (Encounter) करणाऱ्या पोलिसांना निर्दोषत्व बहाल करण्यात आलं आहे. न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाकडून (Justice Dilip Bhosales Judicial Commission) पोलिसांना क्लीनचीट देण्यात आली आहे. स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा न्या. दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाने मान्य केला आहे.

एसआयटी स्थापन करुन चौकशीचे आदेश

advertisement
राज्य मानवाधिकार आयोगाकडूनही पोलिसांना यापूर्वीच क्लीन चीट मिळाली आहे. त्यात आता न्या. दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगानेही पोलिसांना क्लीनचीट दिल्याने पोलिसांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टाकडून मात्र एसआयटी स्थापन करुन चौकशीचे आदेश देण्यात आले होते. कोर्टाने नव्हे तर डीजीपींन एसआयटी स्थापन करावी, असे सुप्रीम कोर्टाचे आदेश होते. अशातच आता पोलिसांना क्लिन चीट देण्यात आली आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Akshay Shinde Encounter : पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला? अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट!
Next Article
advertisement
Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement