advertisement

Mumbai Water: देशाची आर्थिक राजधानी अन् नळाला गढूळ पाणी! मुंबईच्या वांद्रे भागातला किळसवाणा प्रकार

Last Updated:

महाराष्ट्रामध्ये आदिवासी वस्ती आणि डोंगराळ भागातले नागरिक पाण्यासाठी वणवण फिरत असताना मुंबईकरांसमोरही पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे.

News18
News18
मुंबई: पाण्याचा मुद्दा सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आदिवासी वस्ती आणि डोंगराळ भागातले नागरिक पाण्यासाठी वणवण फिरत असताना मुंबईकरांनाही आता पाण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुंबईतील वांद्रे विभागातील नागरिकांना पिण्याचे पाणी अत्यंत गढूळ स्वरूपात येत आहे. त्यामुळे मुंबईकरांसमोर ऐन उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे. पिण्याचे पाणी सुद्धा किती गढूळ स्वरूपात येत आहे, याचा व्हिडिओ सध्या नागरिकांकडून सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.
वांद्रे पूर्वेतील 'अजमेरा शेख' या नावाच्या नागरिकाने घरी दूषित पाणी पुरवले जात असल्याचा आरोप एका व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. एक्सवर शेअर केलेला व्हिडिओ सध्या सर्वच सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये, शहरातील पाण्याच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्न नागरिक विचारताना दिसत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, त्यांनी बादलीमध्ये स्पष्टपणे गढूळ पाणी दाखवलेले आहे. पिण्याचं पाणी इतकं गढूळ जर येत असेल, तर नागरिकांनी ते पाणी कसं काय प्यावं? असा सवाल सध्या सर्वांकडूनच विचारला जात आहे.
advertisement
advertisement
"वांद्रा पूर्वेतील खेरवाडी रोडवरील चाळींमध्ये, बीएमसीकडून अशा पद्धतीचे पाणी सोडलं जातं. एवढे घाण पाणी पिऊन परिसरातले नागरिक आजारी पडत आहेत. बीएमसीला माझी विनंती आहे की, त्यांनी कृपया नागरिकांच्या पाण्याच्या समस्येकडे कृपया लक्ष द्या. पाईपचा जर काही प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा रिपेअर करून द्या. पण लवकरात लवकर ही पाण्याची समस्या सोडवा." शेवटी स्थानिक शाखा अध्यक्ष आणि बृहन्मुंबई महानगर पालिका यांना हा व्हिडिओ टॅग केलेला आहे. सध्या 'अजमेरा शेख' नावाच्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्या नागरिकाने शेअर केलेल्या पोस्टवर बीएमसीने सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. "तुम्ही दिलेली तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित बीएमसीच्या HE- Ward या विभागाला कळविली आहे." नागरिकांनी सोशल मीडियावर दिलेल्या तक्रारींचं महानगर पालिकेकडून लवकरात लवकर निवारण केलं जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Water: देशाची आर्थिक राजधानी अन् नळाला गढूळ पाणी! मुंबईच्या वांद्रे भागातला किळसवाणा प्रकार
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement