Mumbai News: मुंबईत आता मोनो रेल आणि मेट्रो होणार कनेक्ट, कुठे आणि कुठून जोडणार? संपूर्ण माहिती
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
एमएमआरडीएकडून मेट्रो आणि मोनो एकत्र जोडली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मोनो रेल्वे आणि मेट्रो 2 ब एकत्र जोडली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई: मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. एमएमआरडीएकडून नोकरदारांच्या दृष्टीने विचार करून मेट्रो आणि मोनो एकत्र जोडली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मोनो रेल्वे आणि मेट्रो 2 ब एकत्र जोडली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मोनो रेल्वे बंद आहे. चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक दरम्यान धावणारी मोनो रेल्वे आता पुन्हा नव्याने सुरू होणार आहे. मे 2026 पासून मोनो रेल्वे सुरू होणार आहे. सप्टेंबर 2025 पासून अनिश्चित काळासाठी बंद झालेली मोनो रेल्वे आता पुन्हा एकदा नव्याने सुरू होणार आहे. मोनोसोबतच मेट्रो देखील एकत्र सुरू होणार आहे.
मेट्रो 2 ब दोन टप्प्यामध्ये सुरू होणार आहे. मेट्रो 2 ब अंधेरी पश्चिम- मंडाले, मानखुर्द मार्गिका चेंबुर रेल्वे स्थानका सोबत जोडण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्याप्रमाणेच मेट्रो- मोनो रेलची जोडणी करून मोनोरेल आणि चेंबूर मेट्रो स्थानक सेवेमध्ये दाखल होणार आहे. चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मोनो रेल 2025 मधल्या पावसाळ्यापासून बंद झालेली आहे. जेव्हापासून मोनो सुरू झाली, तेव्हापासून मोनो रेल्वेच्या संख्या, त्यांची दुरावस्था आणि सतत होणारे ॲक्सिडंट या सर्व कारणांमुळे मोनो रेल्वे चांगलीच चर्चेत राहिली. मोनो रेल्वेमध्ये संपूर्ण सुधारित आराखड्यांची अंमल बजावणी केली जात आहे.
advertisement
लवकरच मोनो मार्गिकेवर नवीन अत्याधुनिक मोनोरेल प्रणाली आणि अत्याधुनिक गाड्या सेवेत दाखल करून मोनोरेलची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या प्रमाणे एमएमआरडीएकडून सध्या ट्रायल रन देखील सुरू आहे. शिवाय, सुरक्षेच्या दृष्टीनेही मोनोरेलची तपासणी सुरू आहे. मोनो रेल्वेच्या तपासणीसाठी निवृत्त मेट्रो आयुक्त आणि मेट्रो रेल सुरक्षा (सीएमआरएस) स्वतंत्र अभियंता म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळ्याच्या आधीच मेट्रो आणि मोनो जोडून ती सुरू करण्याचा मानस एमएमआरडीएचा आहे. एमएमआरडीएकडून मोनो सुरू करण्याच्या सर्व गोष्टींचा पाठपुरावा सुरू आहे.
advertisement
मेट्रो 2 ब ही दोन टप्प्यात सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात डायमंड नगर ते मंडाले हा पहिला टप्पा येत्या काही दिवसांमध्येच सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे आणि डायमंड गार्डन ते सारस्वत नगर हा दुसरा टप्पा पुढच्या वर्षी म्हणजेच 2027 मध्ये सुरू होणार आहे. त्याच टप्प्यामध्ये चेंबूर मेट्रो स्थानकाचा समावेश करून त्याला जोडणीचे काम ही केले जाणार आहे. खरंतर, मोनो रेल्वेला फार कमी प्रतिसाद मिळत आहे. जेव्हापासून ही मोनोरेल सुरू झाली आहे, तेव्हापासून तिला फार कमी प्रतिसाद मिळतोय. त्याच दृष्टीने एमएमआरडीएने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि मोनोरेल- मेट्रोला कनेक्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. चेंबूर मोनोरेल स्थानक आणि चेंबूर मेट्रो रेल स्थानकामध्ये काही किमीचे अंतर आहे. ही दोन्ही स्थानके थेट कशी जोडता येतील यावर विचार सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 3:19 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: मुंबईत आता मोनो रेल आणि मेट्रो होणार कनेक्ट, कुठे आणि कुठून जोडणार? संपूर्ण माहिती









