लग्नाचं वय उलटून जातं! 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांचं लग्न होत लेट, पार्टनर निवडण्यात नेमकी कुठे होते चूक?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
लग्नासाठी वय झाले तरीही अनेकदा स्थळे येत नाहीत किंवा बोलणी शेवटच्या टप्प्यात येऊन फिस्कटतात. शिक्षण आणि करिअर ही लग्नाला उशीर होण्याची सामाजिक कारणे असली, तरी ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रात याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते.
लग्नासाठी वय झाले तरीही अनेकदा स्थळे येत नाहीत किंवा बोलणी शेवटच्या टप्प्यात येऊन फिस्कटतात. शिक्षण आणि करिअर ही लग्नाला उशीर होण्याची सामाजिक कारणे असली, तरी ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रात याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. काही विशिष्ट तारखांना जन्मलेल्या लोकांच्या कुंडलीत 'विलंबाचे योग' उपजतच असतात.
advertisement
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो. या मूलांकाचा स्वामी 'शनी' आहे. शनी हा ग्रहांच्या मंडळात सर्वात संथ चालणारा ग्रह मानला जातो. शनीचा स्वभाव शिस्तप्रिय, गंभीर आणि कष्टाळू आहे. शनी ज्या गोष्टी देतो, त्या उशिरा पण कायमस्वरूपी देतो, अशी मान्यता आहे.
advertisement
या तारखांना जन्मलेले लोक जोडीदार निवडताना अत्यंत चोखंदळ असतात. त्यांना वरवरचे प्रेम नको असते, तर त्यांना भावनिक आणि वैचारिक परिपक्वता असलेला जोडीदार हवा असतो. त्यांच्या याच 'परफेक्ट' जोडीदाराच्या शोधामुळे आणि शनीच्या संथ गतीमुळे विवाहासाठी विलंब होतो. मात्र, अशा लोकांचे लग्न उशिरा झाले तरी ते नाते अधिक काळ टिकते आणि स्थिर असते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कुंडलीतील सप्तम भाव आणि शनी: ज्योतिषशास्त्रानुसार, जर पत्रिकेच्या सातव्या घरात शनी बसला असेल किंवा शनीची दृष्टी असेल, तर लग्नात वारंवार अडथळे येतात. बोलणी फिसकटणे किंवा ऐनवेळी स्थळ नाकारले जाणे, असे प्रकार घडतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)







