प्रवाशांसाठी खुशखबर! तिरुनेलवेली एक्स्प्रेस आता नव्या रूपात, प्रवास होणार सुखकर
Last Updated:
Indian Railways : एलटीटी-तिरुनेलवेली एक्स्प्रेसमध्ये प्रवासी वाढ लक्षात घेऊन एका मोठा बदल करण्यात आलेला आहे. हा बदल नेमका कोणता आहे आणि कधीपासून सुरु होणार आहे ते पाहूयात.
मुंबई : ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. एका एक्स्प्रेसच्या डब्ब्यात नेमका कोणता बदल केला असून नेमका कोणत्या प्रवाशांना फायदा होणार आहे आणि कोणाला काही समस्येला सामोरे जावे लागेल याबाबत जाणून घ्या.
मुंबई-तामिळनाडू प्रवाशांसाठी मोठा दिलासा
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने गाडी क्रमांक 22629/22630 लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुनेलवेली एक्स्प्रेसमध्ये कायमस्वरूपी सहा अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ही गाडी पूर्वीच्या 16 डब्यांऐवजी तब्बल 22 डब्यांसह धावणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध होणार असून वेटिंग यादीचा ताणही कमी होण्याची अपेक्षा आहे.
advertisement
नव्या रचनेनुसार गाडीत एक एसी द्वितीय श्रेणी, चार एसी तृतीय श्रेणी आणि एक स्लीपर कोचचा डबा वाढवला जाणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा पर्याय मिळेल. विशेषतहा उन्हाळी हंगामात दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असते. या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
'हे' मोठे बदल कधीपासून होणार लागू?
गाडी क्रमांक 22629 लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुनेलवेली एक्स्प्रेस 16 एप्रिलपासून सुधारित रचनेसह एलटीटीहून धावणार आहे. तर गाडी क्रमांक 22630 तिरुनेलवेली-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस 15 एप्रिलपासून तिरुनेलवेली येथून नवीन डब्यांसह मार्गस्थ होईल. या बदलामुळे मुंबई आणि तामिळनाडू दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 15, 2026 10:29 AM IST






