Mumbai Accident : बड्या बापाच्या मुलाचा नाद जीवावर बेतला? सुखी संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ, विद्याविहारला भयंकर थरार
Last Updated:
Mumbai Accident News : विद्याविहार येथे अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवत एक धक्कादायक प्रकार उघवून आणलेला आहे. या प्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.
मुंबई : मुंबईच्या विद्याविहारमध्ये एक अतिशय मोठा अपघात घडलेला आहे. ज्यात दुचाकीवरुन जाणाऱ्या दाम्पत्याला अक्षरशा चिरडलं आहे. या घडलेल्या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झालेला आहे.सध्या ही घटना सर्वत्र चर्चेत आलेली असून पोलिस तपास सुर केला गेला आहे.
अपघात घडला कधी?
मिळालेल्या माहितीनुसार, 05 फेब्रुवारी रोजी मुंबईतील विद्याविहार भागात एका अल्पवयीन मुलाने भरधाव गाडी चालवत दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला चिरडलं. सोमय्या कॉलेजच्या गेट क्रमांक 03 बाहेर हा अपघात घडला असून या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. अल्पवयीन मुलगा किया सेलटास कार चालवत होता पण कारवरचा त्याचा ताबा सुटला आणि त्याने दुचाकीवून जाणाऱ्या दाम्पत्याला जोरदार धडक दिली.
advertisement
अपघाताची तीव्रता अतिशय गंभीर
जखमींचं नाव ध्रुमिल पटेल आणि मिनल पटेल असून दोघांनाही जबर मार लागला आहे. ध्रुमिलच्या डोक्याला मार लागला असून बरगड्या आणि हाताला फ्रॅक्चर आहे तर मीनलचा डोक्याला आणि गुप्तांगाला गंभीर इजा झाली असून हात फ्रॅक्चर झाला आहे.
अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या वडिलांविरोधात याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा अल्पवयीन असल्याने त्या डोंगरी येथील बालसुधार गृहात ठेवण्यात आलं आहे.
advertisement
05 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा पटेल आणि मिनल पटेल हे त्यांच्या दुचाकीवरून घाटकोपर येथील घरी चालले होते. त्याच दरम्यान 17 वर्षांचा अल्पवयीन मुलगा बेदरकारपणे गाडी चालवत आला आणि त्याने पटेल दाम्पत्याला धडक दिली. दोघांवर सध्या घाटकोपर येथील झायनोव्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
अल्पवयीन मुलाला स्टंट करण्याचा नाद!
विद्याविहार परिसरात झालेल्या अपघातानंतर अल्पवयीन कार चालकाला स्टंट करण्याचा नाद होता का असा संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित मुलाचे कार-बाईक स्टंट करतानाचे अनेक व्हिडिओ News18 मराठीच्या हाती लागले आहेत.
advertisement
हे व्हिडिओ पाहता वेगवान आणि धोकादायक ड्रायव्हिंग आणि स्टंट करण्याची त्याची सवय असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे अपघाताच्या वेळीही तो स्टंट करत होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या पोलिसांकडून CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अपघातावेळी नेमकं काय घडलं याचा शोध सुरु आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 1:43 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Accident : बड्या बापाच्या मुलाचा नाद जीवावर बेतला? सुखी संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ, विद्याविहारला भयंकर थरार







