advertisement

पाणीटंचाई टाळण्यासाठी BMC महापौर ॲक्टिव्ह मोडवर, सोसायट्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

Last Updated:

मुंबईमध्ये पाण्याची समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर बीएमसीच्या महापौर रितू तावडे यांनी शहरात पाणी पुरवठा संबंधित तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

News18
News18
मुंबई: मुंबईमध्ये पाण्याची समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी संपूर्ण शहरात पाणी पुरवठा संबंधित तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीदरम्यान, महापौरांनी सध्याच्या पाणीसाठ्याच्या स्थितीचा आणि पाणीपुरवठा खंडित होण्यासंबंधीच्या वाढत्या तक्रारींचा आढावा घेतला. येत्या काही आठवड्यांत नागरिकांना पाण्याची टंचाई टाळण्यासाठी पाण्याच्या व्यवस्थापनाची पद्धत अधिक मजबूत करण्यासाठी आणि उपलब्ध पाण्याच्या साठ्याचा व्यवस्थित वापर करण्याचे आदेश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुंबईची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे निर्माण होणार्‍या आव्हानांवर चर्चा केली. शिवाय, महापौरांनी केवळ पारंपरिक पुरवठा प्रणाली पुरेशी ठरणार नाहीत यावर भर दिला. हवामानातील होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होणार्‍या अतिरिक्त अनिश्चिततेकडे लक्ष वेधत, त्यांनी पाणी व्यवस्थापनासाठी अधिक शाश्वत आणि बहुआयामी दृष्टिकोनाची गरज असल्याचे आवाहन केले. उन्हाळा अधिक तीव्र होत असल्याने, महापौरांनी पर्यायी जलस्रोतांचा शोध घेण्यावर आणि अस्तित्वात असलेल्या परंतु कमी वापरल्या जाणाऱ्या जलस्रोतांना कशा पद्धतीने कायम ठेवले जाईल, याकडे भर दिला. एकूण मागणी कमी करण्यासाठी संवर्धन प्रयत्नांमध्ये नागरिकांना अधिक सक्रियपणे सहभागी करून घेण्यावरही त्यांनी जोर दिला.
advertisement
तात्काळ उपाय योजनांचा एक भाग म्हणून, महापौरांनी अधिकार्‍यांना मुंबईतील सर्व सार्वजनिक, सरकारी- खाजगी विहिरी आणि बोअरवेलची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले. अधिकाऱ्यांना आदेश देत, त्यांचे मुल्यांकन करण्याचेही निर्देश दिले. पाण्याच्या सर्वाधिक मागणीच्या काळात शहराच्या पाणीपुरवठ्याला पूरक ठरू शकतील असे पर्यायी जलस्रोत ओळखणे, हा या निर्णयाचा उद्देश आहे. 2009 साली अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा संदर्भ देत, त्यांनी सांगितले की, त्यावेळी महापालिकेने संकट कमी करण्यासाठी दुरुस्त केलेल्या सार्वजनिक विहिरींचा आधार घेतला होता. त्या अनुभवावरून, योग्य स्थितीत असलेल्या विहिरींचा वापर करा आणि बंद पडलेल्या विहिरींची शक्य तिथे दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.
advertisement
अशा स्रोतांमधील पाणी बागकाम आणि साफसफाईसाठी वापर न करता त्यावर प्रक्रिया करून ते पिण्यासाठी वापरता येईल का, हे ठरवण्यासाठी आवश्यक चाचण्या करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहे. महापौरांनी खाजगी गृहनिर्माण सोसायट्यांना पाणी व्यवस्थापनामध्ये सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले. "सोसायट्यांनी त्यांच्या परिसरात विहीर आणि बोअरवेलची नियमित देखभाल आणि स्वच्छता करावी, आवश्यकतेनुसार योग्य जलशुद्धीकरण प्रणाली बसवावे," असे निर्देश दिले. त्याच वेळी, त्यांनी जमिनीतून पाण्याचा अतिउपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचेही निर्देश दिले.
advertisement
भविष्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि ग्राऊंड वॉटर रिचार्ज सिस्टिमवर महत्त्वाचा भर दिला. जमिनितील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी आणि जास्त काळ पाणी कशा पद्धतीने टिकून राहील, याकडेही लक्ष देण्याचे आदेश गृहनिर्माण सोसायट्यांना देण्यात आले.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
पाणीटंचाई टाळण्यासाठी BMC महापौर ॲक्टिव्ह मोडवर, सोसायट्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement