Thane News : कळस गाठला! पतीसोबत अमृतसरला फिरायला गेली अन् रिक्षाचालकासोबत जुळलं सुत; घरी येताच...
Last Updated:
Thane Shocking Case : पंजाबला फिरून आलेल्या ठाण्यातील कुटुंबातील पत्नी, मुलगा आणि सासू अचानक बेपत्ता झाले. तपासात एक भयंकर सत्य उघड झाले. पोलिसांनी मिसिंग तक्रार निकाली काढली
मुंबई : ठाण्यातील एका कुटुंबासोबत घडलेली एक धक्कादायक घटना नुकतीच समोर आलेली आहे. पंजाबमध्ये फिरायला गेलेले हे कुटुंब पर्यटन आटोपून परत घरी आले. मात्र पुढच्या काही दिवसांत चक्क घरातील तीन सदस्य अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या ढोकाली परिसरात राहणारे 45 वर्षीय व्यक्ती हे आपल्या पती आणि मुलगा, सासूसोबत अमृतसर येथे पर्यटनासाठी गेले होते. मात्र त्या प्रवासादरम्यान त्यांची ओळख एका रिक्षाचालकाशी झाली आणि काही दिवसांनंतर ते परत ठाण्यात परतले.
मात्र 10 जानेवरी रोजी सकाळी तक्रारदार यांची पत्नी,मुलगा आणि सासू हे घरातून गायब झाले. अखेर काहीच समजत नसल्याने तक्रारदाराने कापूरबावडी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
advertisement
दरम्याच घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आणि सुमारे 1 लाख रुपये किंमतीचा कपड्यांचा माल गायब झाल्याचे तक्रार यांच्या लक्षात आले. साधारण 3 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पत्नी निघून गेल्याचे समजले.
तपासाच समोर आली धक्कादायक गोष्ट
पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले की, संबंधित तक्रारदार व्यक्तीची महिला ही अमृतसर येथे स्थायिक झाली आहे. या प्रकरणात कापूरबावडी पोलिसांनी मिसिंग तक्रार अखेर निकाली काढली असून पुढील तपास सुरु ठेवला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 3:01 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Thane News : कळस गाठला! पतीसोबत अमृतसरला फिरायला गेली अन् रिक्षाचालकासोबत जुळलं सुत; घरी येताच...








