advertisement

Pune Crime : 'माझा आत्मा तिला सोडणार नाही...', पुण्यात बिझनेसमॅन तरुणाच्या आयुष्याचा शेवट, 16 पानी चिठ्ठीने प्रकरणात ट्विस्ट!

Last Updated:

Pune jeweller Businessman Ends Life : प्रतीकने प्रेमापोटी तिला 50 हजार रुपयांची सोन्याची अंगठी आणि इतर महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्या होत्या. या प्रकरणात धक्कादायक 16 पानी नोट देखील समोर आली आहे.

Pune jeweller Businessman Ends Life
Pune jeweller Businessman Ends Life
Pune Crime News : प्रेम प्रकरणात कित्येक पोरं फेल होतात. कुणाला आपलं प्रेम मिळतं, कुणाला नाही. त्यातून खचून जायचं नसतं. अशातच एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. पुण्यातील फुरसुंगी भागात एका 29 वर्षीय सराफ व्यावसायिकाने प्रेमात फसवणूक झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण पुण्यात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. या प्रकरणात धक्कादायक 16 पानी नोट देखील समोर आली आहे.

फुरसुंगीत सोन्या-चांदीचे दुकान

तुझ्यासोबत लग्न करेन, असं म्हणत लग्नाचं आमिष दाखवून आणि आजारपणाचे खोटं नाटक रचून तरुणीने फसवणूक केल्यानं, प्रतीक राजेंद्र मेमाणे या तरुणाने आपल्याच दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून फुरसुंगी पोलिसांनी संबंधित तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रतीक मेमाणे यांचे फुरसुंगी सोन्या-चांदीचे दुकान आहे.
advertisement

प्रेमापोटी सोन्याची अंगठी दिली

काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची ओळख भोर येथील श्रेया दादासो खोपडे-देशमुख हिच्याशी झाली होती. या ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात झालं आणि श्रेयाने प्रतीकला लग्नाचे आमिष दाखवलं. प्रतीकने प्रेमापोटी तिला 50 हजार रुपयांची सोन्याची अंगठी आणि इतर महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्या होत्या.

कॅन्सर झाल्याचं सांगून प्रतिकला धोका दिला

advertisement
पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, श्रेयाने आपल्याला कॅन्सर झाल्याचे खोटे सांगून प्रतीकची दिशाभूल केली होती. गंभीर आजार असल्याचे ऐकूनही प्रतीक तिच्याशी लग्न करण्यास तयार होता. मात्र, काही काळानंतर श्रेयाने लग्नासाठी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली आणि वारंवार भेटणे टाळले. प्रेमात झालेली ही फसवणूक आणि मानसिक छळ प्रतीक सहन करू शकला नाही. प्रतिकने आपल्या अखेरच्या चिठ्ठीत तरुणीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.
advertisement

तिला फाशी द्या, अशी माझी इच्छा

दरम्यान, प्रतीकने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून तरुणीवर गंभीर आरोप केले आहेत. तिने फसवणूक केल्यानंतर लग्नाची भीती वाटू लागली आहे. "माझी लग्न करण्याची इच्छा संपली आहे. आई-वडिलांसाठी जगायचे ठरवले होते, पण मनातून ही गोष्ट जात नाही. यातून बाहेर पडता येत नाही. मला ती आवडली होती; मात्र तिने धोका दिला आहे. आई, वडील, ताई मला माफ करा. तिला फाशी द्या, अशी माझी इच्छा आहे; नाही तर माझा आत्मा तिला सोडणार नाही", असं म्हणत प्रतिकने आपली जीवनयात्रा संपवली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : 'माझा आत्मा तिला सोडणार नाही...', पुण्यात बिझनेसमॅन तरुणाच्या आयुष्याचा शेवट, 16 पानी चिठ्ठीने प्रकरणात ट्विस्ट!
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement