Mumbai News : आधी रेकी, मग मालिशचा बहाणा अन् शेवटी ...; शिवाजी पार्कातील त्या घटनेने मुंबई हादरली
Last Updated:
Mumbai Crime : शिवाजी पार्क परिसरात ज्येष्ठ नागरिकांना मालीशच्या बहाण्याने लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. तिघांना अटक करण्यात आली असून, त्यात एक अल्पवयीन आहे. आरोपींकडून आणखी गुन्ह्यांची शक्यता तपासली जात आहे.
संकेत वरक,प्रतिनिधी.मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात वयोरुद्ध नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मालीश करण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करुन चोरी करत होती. या टोळीमुळे गेल्या काही दिवसांपासून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं.
शिवाजी पार्कात 'मालीश गँग'चा पर्दाफाश
मिळालेल्या माहितीनुसार ही चोरट्यांची टोळी अशा घरांची निवड करत असे जिथे फक्त ज्येष्ट व्यक्ती एकटे राहतात. आरोपी आधी ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास संपादर करत असे आणि त्यांना मालिश करण्याचा प्रस्ताव देत घरात प्रवेश करत. त्यानंतर योग्य ती संधी साधून घरातील वृद्धांना बांधून ठेवत घरातील महागड्या वस्तू चोरत असतं.
advertisement
असाच प्रकार एका 62 वर्षीय एका वृ्द्ध व्यक्तीसोबत घडला. त्यानंतर शिवाजी पार्क पोलिसांनी तातडीने तपासाचा वेग वाढवला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेच आणि अन्य माहितीच्या आधारे पोलिसांनी या टोळीचा माग काढत त्यांनी अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींध्ये एक रणविर सिंग(वय19) तर विवेककुमार शिवदंतबनारी कुमार ठाकूर (वय19) आणि एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.प्राथमिक तपासात तर या आरोपींनी अशाच प्रकारे अजून काही गुन्हे केले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 2:45 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : आधी रेकी, मग मालिशचा बहाणा अन् शेवटी ...; शिवाजी पार्कातील त्या घटनेने मुंबई हादरली






