advertisement

Mumbai Metro Line 3च्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, वाहतूक पोलिसांनी लावले कडक नियम

Last Updated:

मुंबई वाहतूक पोलिसांनी मेट्रो लाईन- 3 वरील स्थानकांच्या परिसरात प्रवाशांसाठी कडक नियम लावले आहेत. नेमके कोणते नियम लावले, जाणून घेऊया...

News18
News18
मुंबई: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी मेट्रो लाईन- 3 वरील सर्व स्थानकांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये 'नो पार्किंग झोन' म्हणून जाहीर केलेले आहेत. मेट्रो स्थानकांमध्ये जाणारा आणि बाहेर येणार्‍या अशा दोन्हीही गेटचा परिसर 'नो पार्किंग झोन' म्हणून जाहीर केलेला आहे. दोन्हीही गेट्सच्या 30 मीटरच्या परिसरामध्ये 24 तासांसाठी नो- पार्किंग झोन जाहीर केला आहे. मुंबई 'मेट्रो लाईन 3' चा संपूर्ण 33.5 किमी लांबीचा कॉरिडॉर, ज्याला ॲक्वा लाईन असेही म्हणतात. 9 ऑक्टोबरपासून जनतेच्या सेवेमध्ये ही मेट्रो दाखल झाली होती.
कफ परेड ते आरे कॉलनीपर्यंत धावणारीही मेट्रो दक्षिण मुंबई आणि मुंबई उपनगरांना कनेक्टिव्हिटी देते. मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या गेट्सवरून प्रवासी मेट्रो स्टेशनच्या आत आणि बाहेर जातात तिथे अनेक प्रवासी आपली वाहनं पार्क करतात. त्यामुळे मेट्रो स्टेशनच्या समोर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. अनेक वाहनधारक गेटच्या समोरच त्यांची वाहने पार्किंग करत असल्यामुळे बीएमसीची चांगलीच डोकेदुखी वाढताना दिसत आहे. "पुढील आदेश येईपर्यंत कायमस्वरूपी हा नियम प्रवाशांना लागू करण्यात येणार आहे. मेट्रो लाईन 3 च्या सर्व स्थानकांच्या एन्ट्री आणि एक्झिट गेट्सच्या समोरचा परिसर 'नो पार्किंग एरिया' म्हणून घोषित करणे आवश्यक आहे.", मुंबई महापालिकेने दिलेल्या अधिकृत सूचनेत असे म्हटले आहे.
advertisement
'मेट्रो लाईन 3' ही सेवा मुंबईतील प्रमुख व्यावसायिक ठिकाणांना, शैक्षणिक संस्थांना, धार्मिक स्थळांना आणि प्रमुख शॉपिंग हब यांना जोडते. मेट्रो लाईन सुरू झाल्यापासून, मुंबईकरांकडून 'मेट्रो लाईन 3' ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही मेट्रो अनेक नोकरदारांची कामावर पोहोचण्यासाठी त्यांच्या दैनंदिन वाहतुकीचा भाग बनली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या मेट्रो मार्गावर एकूण 38.63 लाख प्रवाशांची संख्या नोंदवली आहे, ज्यापैकी दररोज सरासरी 1,41,024 प्रवासी प्रवास करत आहेत. गेल्या वर्षी, वाहतूक पोलिसांच्या सर्वेक्षणात असेही दिसून आले की मेट्रो सुरू झाल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरातील गर्दी 30 टक्क्यांनी कमी झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro Line 3च्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, वाहतूक पोलिसांनी लावले कडक नियम
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement