रोहित आर्या कसा बनला किडनॅपर? गँगस्टर कनेक्शन समोर, पुण्यात होता मोठा व्यवसाय

Last Updated:

महाराष्ट्र सरकारसाठी 'स्वच्छता मॉनिटर' अभियान चालवणाऱ्या रोहित आर्याने गुरुवारी गुन्हेगारी कृत्य केलं. त्याने ऑडिशनच्या नावाखाली मुंबईच्या पवईतील आरए स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवलं.

News18
News18
महाराष्ट्र सरकारसाठी 'स्वच्छता मॉनिटर' अभियान चालवणाऱ्या रोहित आर्याने गुरुवारी गुन्हेगारी कृत्य केलं. त्याने ऑडिशनच्या नावाखाली राज्यभरातून काही मुलांना पवईतील आरए स्टुडिओमध्ये बोलावून घेतलं. यानंतर यातील १७ मुलांचं त्यानं अपहरण केलं. स्टुडिओत सर्वांना ओलीस ठेवलं. त्याच्या सरकारकडे काही मागण्या होत्या. त्याला काही लोकांशी बोलायचं होतं. पण पोलिसांनी त्याचं एन्काऊंटर केलं. आता या ओलीस नाट्याबाबत नवनवीन अपडेट समोर येत आहे. सरकारने रोहित आर्या याचे काही पैसे थकवले होते. उपोषण, आंदोलन करूनही पैसे मिळत नसल्याने त्याने हे पाऊल उचललं.

रोहित आर्या कसा बनला किडनॅपर?

'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा', या अभियानातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या 'पीएलसी स्वच्छता मॉनिटर' या प्रकल्पासाठी रोहित आर्याने २ कोटीहून अधिकची रक्कम लावली होती. स्वखर्चातून हे अभियान राबवलं होतं. हेच पैसे परत मिळवण्यासाठी रोहित आर्या प्रयत्न करत होता. यासाठी त्याने तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घराबाहेर उपोषण देखील केलं होतं. पण यातून काहीच तोडगा निघत नसल्याने आणि योजनेसाठी खर्च केलेले पैसे मिळत नसल्याने त्याने हे ओलीस नाट्य घडवल्याची माहिती समोर आली आहे. पण केसरकर यांनी सर्व दावा फेटाळून लावत आपण चेकद्वारे पैसे दिले होते, असं स्पष्टीकरण दिलं आहे.
advertisement

रोहित आर्याचं गँगस्टर कनेक्शन?

रोहित आर्या याची ओळख कुख्यात गँगस्टर हाजी मस्तान याच्या मुलासोबत होती. त्यांच्या दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री होती. त्यांनी मिळून पार्टनरशिपमध्ये पुण्यात बांधकाम व्यवसाय सुरू केला होता. कोथरूड, बाणेर आणि हिंजवडी परिसरात त्यांनी काही मोठे प्रकल्प हाताळले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या प्रकल्पांमधून त्यांना मोठा नफा मिळाला आणि आर्थिकदृष्ट्या स्थिरता प्राप्त झाली. रोहित आणि त्याचे सहकारी पुणे महापालिका निवडणुकीसाठी काही इच्छुक उमेदवारांना मदत करत होते.
advertisement
त्यामुळे त्यांचा राजकीय व व्यावसायिक प्रभाव पुण्यात वेगाने वाढत चालला होता. तो कोथरूड परिसरात वास्तव्यास होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. रोहित आर्या हा पुण्यातील कोथरूड परिसरातील सुतारदारा भागात स्वरांजली सोसायटीमध्ये काही काळ राहायल होता. त्याचे आई-वडील या ठिकाणी वास्तव्य होते. मात्र, गुरुवारी त्याच्या घराला कुलूप असल्याचे दिसून आले तसेच सोसायटीतील इतर स्थानिकांनी त्याच्याबाबत बोलण्यास नकार दिला. त्याची पत्नी एका नामांकित बँकेत काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
रोहित आर्या कसा बनला किडनॅपर? गँगस्टर कनेक्शन समोर, पुण्यात होता मोठा व्यवसाय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement