भाड्याच्या खोलीतच हत्येचा थरार; पुण्यात मित्रानंच केला किशोरचा शेवट, चाकूनं छाती अन् जबडा चिरत संपवलं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
किशोर आणि त्याचा मित्र कपिल जितेंद्र कोसलकर हे दोघे एकत्र असताना त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, कपिलने जवळ असलेल्या धारदार चाकूने किशोरवर हल्ला चढवला.
पुणे : चाकण परिसरात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. नाणेकरवाडी येथे एका मित्रानेच आपल्या मित्रावर धारदार चाकूने सपासप वार करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाकण दक्षिण पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
किशोर सुरेश राणे (वय २५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी (११ फेब्रुवारी) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नाणेकरवाडी येथील एका भाड्याच्या खोलीत ही घटना घडली. किशोर आणि त्याचा मित्र कपिल जितेंद्र कोसलकर हे दोघे एकत्र असताना त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, कपिलने जवळ असलेल्या धारदार चाकूने किशोरवर हल्ला चढवला.
advertisement
छातीवर आणि जबड्यावर वार
आरोपी कपिलने अत्यंत निर्घृणपणे किशोरच्या छातीवर आणि जबड्यावर घाव घातले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या किशोरला आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने रुग्णालयात हलवले. मात्र, जखमा खोल असल्याने आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान किशोर राणे यांचा मृत्यू झाला.
आरोपीला बेड्याघटनेनंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या कपिल कोसलकर याला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. योगेश दत्तात्रेय नाणेकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, चाकण दक्षिण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, इतक्या टोकाच्या थराला जाऊन हत्या करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मित्रांमध्ये पैशांचा व्यवहार होता की काही जुना वाद, याचा तपास पोलीस करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 6:41 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
भाड्याच्या खोलीतच हत्येचा थरार; पुण्यात मित्रानंच केला किशोरचा शेवट, चाकूनं छाती अन् जबडा चिरत संपवलं









