IND vs PAK सामन्यासाठी टीम इंडिया श्रीलंकेत, एअरपोर्टवर सूर्या कुणावर संतापला? Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया श्रीलंकेला रवाना झाली आहे. रविवार 15 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोलंबोमध्ये लढत होणार आहे.
नवी दिल्ली : टी-20 वर्ल्ड कपच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया श्रीलंकेला रवाना झाली आहे. रविवार 15 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोलंबोमध्ये लढत होणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यासाठी भारतीय टीम सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात कोलंबोला पोहोचली आहे.
गुरूवारी टीम इंडियाने नामिबियाविरुद्धच्या सामन्यात 93 रननी दणदणीत विजय मिळवला. नवी दिल्लीमध्ये झालेल्या या सामन्यानंतर भारतीय टीम शुक्रवारी श्रीलंकेला रवाना झाली. टीम बसमधून एअरपोर्टवर उतरत असताना टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव हा चांगलाच संतापला. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
सूर्यकुमार यादव का रागावला?
व्हिडिओमध्ये, एक चाहता सूर्याच्या हाताला स्पर्श करताना दिसत आहे, त्यानंतर सूर्याने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि तो निघून गेला. व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादवच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत आहे.
advertisement
#WATCH | ICC T20 World Cup: Indian Cricket Team leaves for Sri Lanka's Colombo from Delhi airport
India will face Pakistan on February 15 at the R. Premadasa Stadium in Colombo. pic.twitter.com/06aSHtdFhb
— ANI (@ANI) February 13, 2026
advertisement
भारत-पाकिस्तान सामना किती वाजता?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना रविवार 15 फेब्रुवारीला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. तर टॉस 6.30 वाजता होईल, याआधीही टीम इंडियाचे दोन्ही सामने संध्याकाळी 7 वाजताच सुरू झाले होते.
भारत-पाकिस्तानचे 2-2 विजय
या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानने प्रत्येकी 2-2 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने अमेरिका आणि नामिबियाचा पराभव केला आहे, तर पाकिस्तानने नेदरलँड्स आणि अमेरिकेला हरवलं आहे. आता दोन्ही टीम तिसऱ्या सामन्यात एकमेकांसमोर येतील. या सामन्यात विजय मिळवणारी टीम सुपर-8 मध्ये प्रवेश करेल.
advertisement
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान रेकॉर्ड
टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 8 सामने झाले आहेत, ज्यात टीम इंडियाने 7 सामने जिंकले असून एका सामन्यात पाकिस्तानचा विजय झाला आहे.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
Feb 13, 2026 11:54 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK सामन्यासाठी टीम इंडिया श्रीलंकेत, एअरपोर्टवर सूर्या कुणावर संतापला? Video










