advertisement

Railway Ticket App: मुंबईकरांनो UTS App आता बंद होणार, तिकिट बुकिंगसाठी वापरा 'हा' ॲप

Last Updated:

Rail One App: येत्या काही दिवसांमध्ये UTS App लवकरच बंद होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना रेल्वेने दिलेल्या पर्यायी ॲपचा वापर करावा लागणार आहे.

UTS App To Be Shut Down From 1st March 2026 Railways Appeals To Mumbaikars To Switch To Rail One App
UTS App To Be Shut Down From 1st March 2026 Railways Appeals To Mumbaikars To Switch To Rail One App
मुंबई: मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. येत्या काही दिवसांमध्ये UTS App (Unreserved Ticketing System App) लवकरच बंद होणार आहे. त्यामुळे नोकरदारवर्गाला रेल्वेकडून देण्यात आलेल्या पर्यायी ॲपच्या वापरला सुरुवात करायची आहे. लवकरच हे UTS App बंद होणार असून प्रवाशांच्या सेवेत Rail One App आले असून त्याची सुविधा देखील सुरू झाली आहे. प्रवाशांकडून तिकिट ॲपचा सतत गैरवापर केला जात असल्यामुळे रेल्वेने हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. ऑनलाईन तिकिटाच्या सुविधेचा गैरवापर करणाऱ्या बहाद्दरांवर रेल्वेने एक प्रकारे कारवाई केलेलीच आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांच्या सेवेमध्ये Rail One App आले असून UTS App वरील तिकिट सध्या ग्राह्य धरले जात नाहीये. आता लवकरच UTS App कायमचं बंद होणार आहे. येत्या 1 मार्च 2026 पासून UTS App कायमचंच बंद होणार आहे. 1 मार्च 2026 पासून प्रवाशांच्या सेवेमध्ये Rail One App असणार आहे. प्रवाशांच्या सेवांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी लवकरात लवकर Rail One App वर शिफ्ट व्हावं असं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांमध्ये या ॲपची चर्चा होताना दिसत आहे. अनेक प्रवाशांचे तिकिट अजूनही UTS App वरच आहे, त्यामुळे अनेक प्रवासी आमच्या तिकिटाचं 1मार्च नंतर काय होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
advertisement
UTS App मधील R- Wallet मधील तुमची रक्कम जशीच्या तशीच राहणार आहे, ती कुठेही जाणार नाही किंवा संपणार नाही. UTS App मधल्या R- Wallet मधील रक्कम तुम्ही Rail One App मधील R- Wallet मध्ये वापरू शकणार आहे, असं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईकरांना आता UTS App चं नवीन व्हर्जन डाउनलोड किंवा अपडेट करणाऱ्या युजर्सना आता प्लॅटफॉर्म तिकीट बुक करता येणार नाही किंवा R-Wallet चा रिचार्ज सुद्धा करता येणार नाही. UTS App आता 1 मार्च 2026 पासून कायमचं बंद होणार आहे. UTS App प्रमाणेच Rail One App सुद्धा असणार आहे. तुम्हाला Rail One App वर प्रवाशी तिकिट, प्लॅटफॉर्म तिकिट आणि रेल्वेबद्दलही माहिती सुद्धा एका क्लिकवर मिळेल.
advertisement
रेल वन ॲपचा वापर
Rail One App विषयी बोलायचे तर, प्रवाशांना सर्व प्रकारचे तिकिट्स एकाच ॲपवर उपलब्ध होणार आहे. यामध्ये रिझर्व्हेशन तिकिट, प्रवासी तिकिट आणि प्लॅटफॉर्म तिकिट यांचा समावेश आहे. प्रवाशांना R- Wallet सोबतच, युपीआय (UPI), डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, आणि नेट बँकिंगचा सुरक्षित पर्याय देण्यात आला आहे. प्रवाशांना ट्रेनचे लाईव्ह अपडेट, कोचची स्थिती आणि प्लॅटफॉर्मची माहिती ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना मिळवता येणार आहे. पीएनआर स्टेटस तपासणं, तिकीट रद्द करणं आणि रिफंडचा मागोवा घेणं हे काम सुद्धा जलद होणार आहे. IRCTC मान्यताप्राप्त विक्रेत्यांकडून जागेवर जेवण मागवण्याची आणि रेलमदत ॲपच्या माध्यमातून तक्रारी नोंदवण्याची सोयही यात करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Railway Ticket App: मुंबईकरांनो UTS App आता बंद होणार, तिकिट बुकिंगसाठी वापरा 'हा' ॲप
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement