advertisement

'या लोकांची साथ देऊन तू...', निक्कीची बॉडी शेमिंग करणाऱ्या प्रिन्स नरुलावर जान्हवीचा संताप, शिव ठाकरेलाही चांगलंच झापलं

Last Updated:
Janhvi Killekar Slammed Shiv Thakre: 'द ५०' या शोमधून जान्हवी किल्लेकरची एक्झिट अनपेक्षित होतीच, पण बाहेर आल्यावर तिने शोमध्ये घडणाऱ्या एका घाणेरड्या प्रकारावरही तिचं रोखठोक मत व्यक्त केलं आहे.
1/7
मुंबई : 'द ५०' या रिअ‍ॅलिटी शोमधून बाहेर पडलेली मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सध्या प्रचंड संतापलेली पाहायला मिळत आहे. तिची एक्झिट अनपेक्षित होतीच, पण बाहेर आल्यावर तिने शोमध्ये घडणाऱ्या एका घाणेरड्या प्रकारावरही तिचं रोखठोक मत व्यक्त केलं आहे.

2/7
 "विरोधी टीमने मला षडयंत्र रचून बाहेर काढलं," असा आरोप जान्हवीने केलाच, पण तिचा खरा निशाणा होता प्रिन्स नरुला आणि शिव ठाकरे यांच्यावर. नॅशनल टेलिव्हिजनवर एका महिलेच्या दिसण्यावरून आणि कपड्यांवरून तिची थट्टा उडवणं जान्हवीला अजिबात आवडलेलं नाही.

3/7
एका मुलाखतीत बोलताना जान्हवीने प्रिन्स नरुलाच्या वागणुकीचा तीव्र शब्दांत निषेध केला. तिने सांगितलं की, प्रिन्स आणि शिव मिळून निक्की तांबोळीच्या शारीरिक ठेवणीवर आणि दिसण्यावर अत्यंत खालच्या थराच्या कमेंट्स करत होते.

4/7
जान्हवी म्हणाली,
जान्हवी म्हणाली, "प्रिन्स नरुला, तुम्हाला लोक आदर्श मानतात. तुमचे लाखो फॉलोअर्स आहेत. पण जर तुम्ही अशा प्रकारे एखाद्या मुलीला बॉडी शेम करत असाल, तर तुमचे फॉलोअर्स काय शिकतील? त्यांना वाटेल की मुलींची थट्टा केल्यावर आपणही हिरो बनतो. हे अत्यंत घातक आहे. तुमच्याही घरात पत्नी, आई आणि मुलगी आहे. उद्या तुमच्या घरच्या स्त्रियांबद्दल कोणी असं बोललं तर तुम्हाला चालेल का?"
advertisement
5/7
जान्हवीने केवळ प्रिन्सलाच नाही, तर महाराष्ट्राचा लाडका शिव ठाकरे यालाही खडे बोल सुनावले आहेत. शिव या सर्व प्रकारावर हसताना दिसला, हे जान्हवीला अजिबात आवडलेलं नाही.
जान्हवीने केवळ प्रिन्सलाच नाही, तर महाराष्ट्राचा लाडका शिव ठाकरे यालाही खडे बोल सुनावले आहेत. शिव या सर्व प्रकारावर हसताना दिसला, हे जान्हवीला अजिबात आवडलेलं नाही.
advertisement
6/7
ती म्हणाली,
ती म्हणाली, "या प्रकारावर शिवही हसत होता, हे खरंच खूप लज्जास्पद आहे. महाराष्ट्रातील मुलगा, जो इतक्या अभिमानाने आपली मतं मांडतो, त्याच्याकडून हे अपेक्षित नाही. मी अजूनही त्याचा खूप आदर करते. रिअ‍ॅलिटी शो येतील आणि जातील, पण तुमची ओळख महत्त्वाची आहे. अशा लोकांची साथ देऊन तुम्ही स्वतःची प्रतिमा मलीन करून घेत आहात. शिवने आपण कोणाच्या बाजूने उभं आहोत, याचा एकदा गांभीर्याने विचार करायला हवा."
advertisement
7/7
निक्कीसोबतच या दोघांनी नेहल चुडासमा हिच्या पेहरावावरूनही तिची चेष्टा केल्याचा दावा जान्हवीने केला आहे. एका महिलेच्या कपड्यांवरून किंवा शरीरयष्टीवरून तिला कमी लेखणं हे संस्कारांना धरून नाही, असं म्हणत जान्हवीने प्रिन्सच्या वागण्यावर ताशेरे ओढले आहेत.

8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement