BMC Mayor Ritu Tawde : मुलगा कॉम्प्युटर इंजिनियर, मुलगी अॅडवोकेट! भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे कोण?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Who is Ritu Tawde BJP Candidate For BMC : भारतीय जनता पक्षाकडून रितू तावडे यांना मुंबईच्या महापौरपदाची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचं धक्कातंत्र पुन्हा पहायला मिळालं.
BMC Mumbai Mayor BJP Candidate Ritu Tawde : गेल्या काही दिवसांपासून मुंबईचा पुढचा महापौर कोण होणार? असा सवाल विचारला जात होता. अशातच आता या प्रश्नला पूर्णविराम दिला गेला असून भाजपने महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला गेला आहे. भाजपने घाटकोपरच्या रितू तावडे यांचं नाव महापौर पदासाठी नाव जाहीर केलं तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे संजय घाडी यांच्या नावाची घोषणा झाली. पण रितू तावडे यांच्या नावाची घोषणा होताच भाजपने पुन्हा धक्कातंत्राचा वापर केल्याचं पहायला मिळालं. रितू तावडे आहे तरी कोण? जाणून घ्या.
रितू तावडे आहे कोण?
रितू तावडे या घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक 132 मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे हा मतदारसंघ गुजराती बहुल आहे. मात्र रितू तावडे या स्वतः मराठा समाजातील असून एक खंबीर मराठी चेहरा म्हणून ओळखल्या जातात. त्यांना महापौरपद देऊन भाजपकडून एकाच वेळी दोन मोठे मास्टरस्ट्रोक खेळण्याचा विचार केल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे, मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणाऱ्या त्या पक्षाच्या पहिल्या महिला महापौर ठरल्या आहेत.
advertisement
पहिल्या भाजप महिला महापौर
रितु तावडे यांचा राजकीय प्रवास हा सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी जोडलेला आहे. शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा आणि माजी नगरसेविका म्हणून त्यांनी मुंबईच्या शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या निवडीमुळे घाटकोपर आणि ईशान्य मुंबईतील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रितु तावडे यांचे कार्य केवळ पालिका सभागृहापुरते मर्यादित राहिलेले नाही. त्यांनी केलेल्या काही प्रमुख कामांची दखल जागतिक स्तरावरही घेतली गेली आहे.
advertisement
महिलांसाठी मोठं काम
'महिला आर्थिक विकास महामंडळाच्या' माजी संचालिका म्हणून काम करताना त्यांनी हजारो महिलांना रोजगाराचे साधन मिळवून दिले. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेतून महिलांना जरिकामालासारख्या व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवले. घरगुती हिंसाचाराला बळी पडणाऱ्या महिलांना त्या आजही मोफत कायदेशीर सल्ला आणि संरक्षण मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असतात.
advertisement
मुलगा कॉम्प्युटर इंजिनियर, मुलगी अॅडवोकेट!
दरम्यान, रितू तावडे यांचं एस.वाय.बी.कॉम शिक्षण झालंय. तर त्या शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा होत्या. तर मुलगी मधुरा या वकील असून मुलगा यश हा कॅम्प्युटर इंजिनियर आहे. महापौरपदाची धुरा सांभाळल्यानंतर, 'शासन आपल्या दारी' आणि 'लाडकी बहीण' यांसारख्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक मुंबईकरापर्यंत पोहोचवणे, हे आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितलं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 11:27 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
BMC Mayor Ritu Tawde : मुलगा कॉम्प्युटर इंजिनियर, मुलगी अॅडवोकेट! भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे कोण?










