Girija Oak : काय बोलतेस! मराठमोळ्या गिरीजा ओकचं गुजराती कनेक्शन, अभिनेत्रीने पहिल्यांदाच सांगितलं स्वत:चं सीक्रेट
- Published by:Priya Lad
Last Updated:
Girija Oak : निळ्या साडीमुळे रातोरात नॅशनल क्रश बनलेली गिरीजा ओक जिने सोशल मीडियावर आपला एक व्हिडीओ पोस्ट करत तिचं एक सीक्रेट सांगितलं आहे, जे कुणालाच माहिती नव्हतं.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री गिरीजा ओक चांगलीच चर्चेत आली होती. तिचे निळ्या साडीतील फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले होते, जे लोकांच्या पसंतीस पडत होते. मराठमोळी गिरीजा ओक नॅशनल क्रश बनली. तिच्याबाबत जाणून घेण्याची लोकांची उत्सुकता वाढली. तिला काय आवडतं, काय नाही, तिच्या आयुष्यातील व्यक्ती सगळं सगळं काही... गिरीजा ओकबाबत बऱ्याच गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या असतील. पण अभिनेत्रीने पहिल्यांदाच तिचं एक सीक्रेट सांगितलं आहे, मराठी असून तिचं गुजराती कनेक्शन.
निळ्या साडीनंतर गिरीजा ओक आता भाषेमुळे चर्चेत आली आहे. गिरीजा ओकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात ती गुजराती भाषेत बोलताना दिसते आहे. गिरीजाने स्वत:च तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात ती सांगते की काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात ती गुजराती बोलत होती, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं. इतकं छान गुजराती कशी काय बोलते, तू गुजराती आहेस का? असा प्रश्न अनेकांनी तिला विचारलं. याच प्रश्नाचं उत्तर देणारा व्हिडीओ गिरीजाने शेअर केला आहे. ज्यात तिने ती इतकं छान गुजराती कसं बोलते, तिचं गुजरातीशी कनेक्शन काय हे स्पष्टपणे सांगितलं आहे.
advertisement
व्हिडीओत गिरीजा सांगते, मी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात गुजराती बोलले तेव्हा अनेकांनी मला गुजराती कसं येतं, मी गुजराती आहे का? असे प्रश्न विचारले. तर मी मराठीच आहे, पण मला गुजराती आवडतं. मी जिथं राहायचे, लहानाचे मोठे झाले, माझं शाळा-कॉलेजचं शिक्षण झालं ते ठिकाण म्हणजे मुंबईतील कांदिवली. जिथं खूप गुजरातील लोक राहतात. त्यामुळे माझं गुजराती चांगलं आहे. मला गुजराती बोलता येते, वाचता येते, लिहायलाही आवडेल पण तितकं लिहिता येत नाही.
advertisement
advertisement
हा व्हिडीओ गिरीजाने पूर्णपणे गुजरातीत केला आहे, तिचं हे टॅलेंट पाहून चाहते थक्क झाले आहेत. मराठी चाहत्यांसह गुजरातींनीही तिच्या व्हिडीओवर कमेंट केले आहेत. ती गुजरातींपेक्षाही खूप छान गुजराती बोलत असल्याची प्रतिक्रिया काही गुजराती नेटिझन्सनी दिली आहे. असं काय आहे, जे तुला येत नाही? असंही एका युझरने विचारलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 11:22 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Girija Oak : काय बोलतेस! मराठमोळ्या गिरीजा ओकचं गुजराती कनेक्शन, अभिनेत्रीने पहिल्यांदाच सांगितलं स्वत:चं सीक्रेट








