कपडे फाडले, मग तोंडात अबॉर्शनची गोळी कोंबली अन्… बंगालनंतर आणखी एका युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थिनीवर अमानुष अत्याचार

Last Updated:

पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच, आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आला आहे.

News18
News18
New Delhi : पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच, राजधानी दिल्लीत विद्यापीठ आवारात एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. एका नावलौकिक युनिव्हर्सिटीमध्ये एका मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शॉकिंग गोष्ट म्हणजे यात एका गार्डचा समावेश देखील आहे.
कधी घडली ही घटना?
दिल्लीतील छत्तरपूर परिसरात दक्षिण आशियाई विद्यापीठ आहे. या विद्यापीठातील एक विद्यार्थिनी सोमवारपासून बेपत्ता होती. मंगळवारी ती जखमी अवस्थेत आढळली. तिच्या अंगावरचे कपडे फाटले होते आणि अंगावर जखमाही होत्या. ही घटना 12 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी घडली. दोन दिवसांपर्यंत ना पोलिसांना बोलावण्यात आले ना विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, ओळखीच्या व्यक्तीकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिस पोहोचले आणि त्यांनी मंगळवारी वैद्यकीय तपासणी केली आणि तिचा जबाब नोंदवला. पीडितेने एका गार्ड, दोन विद्यार्थी आणि एका अज्ञात पुरूषावर आरोप केले आहेत. पीडितेने या सर्व प्रकरणानंतर जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब दिला आहे ज्या जबाबत तिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. या घटनेपूर्वी एक विद्यार्थी (आर्यन यश) हा तिला वारंवार सोशलमीडिया आणि ई-मेलद्वारे त्रास देत असल्याचं तिने सांगितलं. ई-मेलद्वारे आणि सोशल मीडियावर अश्लील आणि धमकी देणारे मेसेज तो करायचा असं तिने सांगितलं.
advertisement
पिडीतेसोबत केले दुष्कर्म
एफआयआरनुसार, 12 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता, पीडिता मेस हॉलकडे जाणाऱ्या रस्त्याने जाणाऱ्या एका बांधकामाधीन इमारतीजवळ बसली होती. ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. तिथे एक सुरक्षारक्षक तैनात होता. त्याने कोणालातरी हाक मारली, पण पीडितेला त्यांचे संभाषण ऐकू आले नाही. थोड्याच वेळात, एक मध्यमवयीन माणूस आला. सुरुवातीला ते आपापसात गप्पा मारत होते. नंतर, तो तिच्या जवळ उभा राहिला आणि तिला विचारपूस करू लागला. दरम्यान, दोन मुले धावत आली त्यापैकी एकाने तिचे खांदे धरले आणि तिचे जॅकेट काढण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्याने तिच्या डोळ्यात बोट घालून तिला वरच्या मजल्यावर ओढण्यास सुरुवात केली. आरोपीने तिला जवळच्या रिकाम्या खोलीत ओढले.
advertisement
गर्भनिरोधक गोळी देऊन केला बलात्कार
आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी जबरदस्ती तिच्या तोंडात गर्भनिरोधक गोळी कोंबली आणि मग त्यांनी तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. या सर्व घटनेनंतर आणखी एक खटकणारी गोष्ट समोर आली. पिडीतेसोबत अत्याचार होत असताना, एक मेस कर्मचारी गाडी घेऊन आला. त्यांना येताना पाहून ते चारही आरोपी पळून गेले. या संपूर्ण घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वसतिगृह प्रमुखाचे वर्तन. त्याला आदल्या रात्रीच माहिती देण्यात आली होती. घटनास्थळी धावून पीडितेला मदत करण्याऐवजी त्याने तिला सकाळी येण्यास सांगितले. शिवाय, त्यांनी पोलिसांना बोलवा किंवा तिला रुग्णालयात घेऊन जाण्याच्या तिच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले, त्याऐवजी तिला कपडे बदलून आंघोळ करण्यास सांगितले.
advertisement
पोलिसांकडे तक्रार नोंदवताच तपासाला सुरुवात
सोमवारी सकाळी, जेव्हा ती तिच्या कुटुंबियांना तिच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल सांगण्यासाठी व्हिडिओ कॉल करत होती, तेव्हा तिला थांबवण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांना 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता विद्यार्थिनीकडून लैंगिक अत्याचाराची तक्रार मिळाली.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पीडितेची वैद्यकीय तपासणी केली आणि तिला समुपदेशनासाठी पाठवले. या घटनेमुळे पीडिता घाबरली होती. तिच्या जबाबाच्या आधारे, मंगळवारी भारतीय दंड संहितेच्या कलम 70, 62, 123, 140 (3), 115 (2), 126 (2) आणि 3 (5) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला.
view comments
मराठी बातम्या/देश/
कपडे फाडले, मग तोंडात अबॉर्शनची गोळी कोंबली अन्… बंगालनंतर आणखी एका युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थिनीवर अमानुष अत्याचार
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement