advertisement

Crime News: सासू-नवऱ्याच्या छळाचा राग मुलांवर काढला, आधी त्यांना संपवलं, अन् स्वत: नंतर ....,

Last Updated:

Crime News: कौटुंबिक छळ आणि वादातून एका मातेने आपल्या तीन पोटच्या मुलांची गळफास लावून हत्या केल्याची धक्कादायक घटना बागलकोट जिल्ह्यातील बदामी तालुक्यातील हिरेमुचलगुड्डू गावात घडली आहे.

सासू-नवऱ्याच्या छळाचा राग मुलांवर काढला, आधी त्यांना संपवलं, अन् स्वत: नंतर ....,
सासू-नवऱ्याच्या छळाचा राग मुलांवर काढला, आधी त्यांना संपवलं, अन् स्वत: नंतर ....,
Crime News:  कौटुंबिक छळ आणि वादातून एका मातेने आपल्या तीन पोटच्या मुलांची गळफास लावून हत्या केल्याची धक्कादायक घटना बागलकोट जिल्ह्यातील बदामी तालुक्यातील हिरेमुचलगुड्डू गावात घडली आहे. मुलांची हत्या केल्यानंतर या महिलेने डिझेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी दुपारी १ च्या सुमारास उघडकीस आली.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, रूपा हणमंत गौडर असे या महिलेचे नाव असून ती या घटनेतून बचावली आहे. समृद्धी (५ वर्षे), प्रीतम (४ वर्षे) आणि सुक्षित (२ वर्षे) अशी मृत मुलांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी सकाळी १० वाजता रूपाचा पती हणमंत आपल्या आईला (सासू) गावातील मंदिरात सोडून कामावर गेला होता. सकाळी १० ते दुपारी १ या दरम्यान घरात कोणीही नसल्याची संधी साधून, रूपाने रागाच्या भरात आधी तिन्ही मुलांना गळफास लावला आणि त्यानंतर स्वतः डिझेल पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.
advertisement

असा समोर आला प्रकार...

दुपारी १ वाजता हणमंत घरी परतला असता घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. आत गेल्यावर तिन्ही मुले मृतावस्थेत आढळली, तर रूपा बेशुद्ध पडलेली होती. तिला तातडीने बागलकोट येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
advertisement

पोलिस तपास आणि कारवाई

बागलकोटचे जिल्हा पोलीस प्रमुख सिद्धार्थ गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कौटुंबिक कलह आणि पती हणमंत व सासू रेणव्वा यांच्या छळाला कंटाळून रूपाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे. सध्या रूपा बेशुद्ध असून, ती शुद्धीवर आल्यानंतर तिचा जबाब नोंदवला जाईल. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल,' असे त्यांनी सांगितले.
advertisement
याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Crime News: सासू-नवऱ्याच्या छळाचा राग मुलांवर काढला, आधी त्यांना संपवलं, अन् स्वत: नंतर ....,
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement