उन्हाळ्यात तुम्हीही जनावरांना हिरवा चारा देताय? होऊ शकतो जीवघेणा आजार, जाणून घ्या उपचार
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Animal Care in Summer: उन्हाळ्यात जनावरांना पोटफुगी सारख्या आजारांचा धोका असतो. यासाठी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत माणसांप्रमाणेच मुक्या प्राण्यांना देखील त्रासाला सामोरं जावं लागतं. रखरखत्या उन्हात जनावरांमध्ये पोटफुगी सारख्या गंभीर आजाराचा धोका असतो. विशेषत: जनावरांचा चारा अचानक बदलला किंवा जास्त हिरवा चारा दिल्यास पोट फुगण्याचा धोका असतो. जनावरांच्या पोटात गॅस झाल्याने ते अस्वस्थ होतात आणि वेळीच उपचार न झाल्यास पोटफुगी जीवघेणीही ठरू शकते.
advertisement
झारखंडमधील प्रसिद्ध पशुवैद्य डॉ. अनिक कुमार सांगतात की, जनावरांत पोट फुगणे हा आजार प्रामुख्याने हिरवा चारा जास्त प्रमाणात खाल्ल्याने किंवा अचानक चाऱ्यात बदल झाल्याने होतो. प्राण्यांच्या पोटात किण्वन प्रक्रिया वेगाने सुरू होते, ज्यामुळे जास्त वायू निर्माण होतो आणि कधीकधी तो प्राणघातक देखील ठरू शकतो.
advertisement
advertisement
पोट फुगणे रोखण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संतुलित, स्वच्छ आणि ताजे अन्न देणे हेच असल्याचं डॉ. कुमार सांगतात. तसेच प्राण्यांना खिळे, प्लास्टिक, वायर किंवा चामडे यासारख्या गोष्टी खाण्यापासून रोखले पाहिजे. याशिवाय उन्हाळ्यात जास्त बाजरी, गहू किंवा कुजलेले अन्न देणे देखील टाळावे. लग्नातील उरलेल्या अन्नामुळे अनेक वेळा पोट फुगण्याची समस्या वाढते.
advertisement
एखाद्या प्राण्याला पोट फुगण्याचा त्रास होत असेल, तर पशुवैद्यक एका विशेष पद्धतीने पोटातून वायू काढून टाकतात. त्यामुळे गाई-गुरांना आराम मिळतो. जनावरांना सावलीच्या ठिकाणी ठेवणे, त्यांना दिवसातून किमान तीन वेळा चांगले पाणी देणे. तसेच त्यांच्या वजनानुसार हिरवा आणि कोरडा चारा यांचे मिश्रण देणे देखील महत्त्वाचे आहे.








