बँकेमधील नोकरी सोडली, कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला, तरुणाची कमाई आता लाखात!
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
केवळ 50 गावरान कोंबड्यांपासून सुरू केलेला हा व्यवसाय आता 1 हजार पक्ष्यांपर्यंत वाढवला आहे. त्याचबरोबर स्वतःची हॅचरी असल्याने पिल्ले विक्रीतून देखील त्याची मोठी कमाई होतेय.
advertisement
advertisement
advertisement
बँकेचे टार्गेट किती दिवस पूर्ण करायचं? त्यापेक्षा आपण आपलंच टार्गेट पूर्ण करूयात, असं म्हणत त्याने स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करावा या दृष्टीने विचार सुरू केला. कुक्कुटपालन हा व्यवसाय या आधी देखील केला असल्याने त्याने या व्यवसायाची निवड केली. सुरुवातीला गाव वस्तीवरून 10-12 अशा शुद्ध गावरान कोंबड्या जमा करून 50 कोंबड्यांपासून या व्यवसायाची सुरुवात केली.
advertisement
advertisement
त्याच्याकडे स्वतःचीच हॅचरी असून या माध्यमातून महिन्याकाठी 700 ते 800 पिलांची निर्मिती केली जाते. एक महिन्याचा पक्षी दीडशे रुपये प्रति पक्षी या दराने विक्री केला जातो. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये या पक्षांना मागणी आहे. त्याचबरोबर अंडी विक्री व मोठ्या पक्षांच्या विक्री मधूनही त्याला कमाई होत आहे.
advertisement
कुक्कुटपालन व्यवसायात नव्याने येणाऱ्य तरुणांनी 20 ते 25 कोंबड्यांपासून सुरुवात करावी. तसेच 100 ते 150 पिलांपासून देखील व्यवसायाची सुरुवात होऊ शकते. जसा अनुभव येत जाईल, तसा व्यवसाय वाढवत न्यावा. व्यवसाय कोणताही असो त्यामध्ये प्रामाणिक प्रयत्न आणि काटेकोर नियोजन केलं तर चांगला आर्थिक फायदा मिळतो, असं विशाल लांडगे सांगतात.









