Numerology: अनपेक्षित खात्यावर पैसा येणार! या मूलांकांना गुरुवार लकी ठरणार; उत्तम यशाचा दिवस
- Published by:Ramesh Patil
- trending desk
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Daily Numerology: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 6 फेब्रुवारी 2025चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)नको असलेल्या व्यक्तींचा सहवास भासेल. यामुळे तुमच्या रेप्युटेशनवर परिणाम होऊ शकेल. आईशी प्रेमळ संवादाची शक्यता आहे. विरोधक सक्रिय आहेत; मात्र क्लृप्ती आणि मुत्सद्देगिरीच्या साह्याने तुम्ही त्यांना नामोहरम कराल. विविध स्रोतांतून पैसे येतील. रोमान्सची शक्यता फारशी नाही.Lucky Number : 17Lucky Colour : Saffron
advertisement
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)माहितीचा स्रोत तपासून पाहायची सवय लावा. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या एखाद्या त्रासापासून सुटका होऊ शकेल. असमाधानाची एखादी भावना दिवसभर मनात राहील. वैद्यकीय खर्च जास्त होण्याचे संकेत आहेत; मात्र आरोग्याचा प्रश्न तुमच्या नसेल. आंतरराष्ट्रीय व्यापारातल्या व्यक्तींची कामगिरी चांगली होईल. आजचा दिवस प्रेमाचा आहे. चांगल्या आठवणी तयार होतील.Lucky Number : 5Lucky Colour : Magenta
advertisement
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)नातेवाईकांसह वेळ व्यतीत कराल. तुम्हाला हवं असलेलं ज्ञान मिळवण्याची संधी मिळेल. शारीरिकदृष्ट्या उत्तम वाटेल; नवा फिटनेस कार्यक्रम हाती घ्याल. करिअरदृष्ट्या बिझनेस आणि आनंद यांची सांगड घाला. तुम्ही आणि जोडीदार एकत्रितपणे कुटुंबीयांशी मजेशीर काही तरी कराल.Lucky Number : 8Lucky Colour : Lavender
advertisement
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)भावंडांशी नातेसंबंध ताणलेले राहतील. आनंदी आणि समाधानी असाल. आजचा दिवस उत्तम यशाचा असेल. काळजी घेतली नाही, तर काही तरी मौल्यवान वस्तू गमावू शकाल. कर्ज होईल. जोडीदाराशी भांडण झाल्यामुळे विनाकारण ताण येईल.Lucky Number : 7Lucky Colour : Yellow
advertisement
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)मित्रांशी वादात अडकू नका. कारण त्यामुळे मनःशांती बिघडेल. आईजवळ राहत असलात, तर तुमच्या दोघांपैकी एक कोणी तरी दूर जाण्याची शक्यता आहे. एखादा खटला वर येण्याची शक्यता आहे. सातत्याने केलेल्या कष्टांमुळे करिअर चांगलं घडेल. पीअर ग्रुपकडून कौतुक होईल. संध्याकाळी प्रेम आणि पॅशन अनुभवायला मिळेल. त्याआधी काही अडथळ्यांवर मात करावी लागेल.Lucky Number : 5Lucky Colour : Green
advertisement
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)भावंडांबद्दल मत्सर हे चिंतेचं कारण आहे. त्यामुळे चिंता वाटेल. आज आईला मदतीची गरज लागण्याची शक्यता आहे. डोळ्यांच्या स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे. बिझनेसची प्रगती होईल, उत्पन्नही वाढेल. इंटिमेट भावना तीव्र होतील. तुम्ही किंवा जोडीदाराला अधिक दृढ आणि अर्थपूर्ण नातं हवं असेल.Lucky Number : 18Lucky Colour : Black
advertisement
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)सिबलिंग रायव्हलरीमुळे चिंता वाढेल. आनंदी आणि समाधानी आहात. आजचा दिवस उत्तम यशाचा आहे. तुमच्या यशाबद्दल काही जणांना असूया वाटते. इंटरनॅशनल मार्केट्समध्ये तुमचे बिझनेस काँटॅक्ट्स ऑप्टिमाइझ करा. डोळे उघडे ठेवा. जोडीदार भेटण्याची शक्यता आहे.Lucky Number : 3Lucky Colour : Blue
advertisement
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)तुमच्या इच्छेनुसार प्राप्ती होईल. ग्रुप अॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी व्हाल. डोळ्यांची समस्या तीव्र होईल. वैद्यकीय सल्ला घ्या. जोडीदाराशी बोला, भावना व्यक्त करा. त्यामुळे प्रेमजीवन समृद्ध होईल.Lucky Number : 8Lucky Colour : White
advertisement
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)प्रलंबित प्रकल्प पुढे सरकण्यासाठी काही अवघड व्यक्तींसह काम करावं लागेल. आज बिनधास्त मूडमध्ये असाल. आज मानसिक ऊर्जा उच्च पातळीवर असेल. हा मोठा प्लस पॉइंट असेल. अनपेक्षित स्रोतांकडून पैसे मिळतील. सेन्सुअल आनंद घ्याल.Lucky Number : 18Lucky Colour : Purple






