एक अंक आणि रंग पालटणार नशीब, तूळ ते मीन राशींसाठी कोणता नंबर आणि कलर ठरणार गेम चेंजर?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, आपल्या दैनंदिन जीवनातील ऊर्जा संतुलित करण्यासाठी शुभ रंग आणि अंकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आज 8 एप्रिल 2026 रोजी ग्रहांची बदललेली स्थिती आणि नक्षत्रांचा प्रभाव पाहता, ठराविक रंगांचा आणि क्रमांकांचा वापर तुमच्यासाठी 'गेम चेंजर' ठरू शकतो.
advertisement
तूळ - नारंगी रंग आणि अंक 5: तूळ राशीच्या जातकांसाठी आज नारंगी रंग उत्साह आणि सर्जनशीलता वाढवणारा ठरेल. हा रंग परिधान केल्याने सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव पडेल. अंक 5 आज तुमच्यासाठी प्रगतीचा मार्ग सुकर करेल. व्यापारात नवीन संधी शोधणाऱ्यांसाठी हा क्रमांक अत्यंत शुभ ठरेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
advertisement
वृश्चिक - हिरवा रंग आणि अंक 4: वृश्चिक राशीसाठी आज हिरवा रंग मानसिक शांती आणि समृद्धीचे प्रतीक ठरेल. नवीन प्रकल्पाची आखणी करण्यासाठी हा रंग लकी सिद्ध होईल. अंक 4 तुम्हाला आर्थिक नियोजनात मदत करेल. भागीदारीच्या व्यवसायात आज सावध राहून निर्णय घ्या, मात्र या अंकाच्या प्रभावामुळे तुम्हाला यश मिळण्याची शक्यता अधिक आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मीन - गुलाबी रंग आणि अंक 10: मीन राशीच्या लोकांसाठी आज गुलाबी रंग प्रेम आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण करेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. अंक 10 आज पूर्णत्वाचा अंक असून तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला मोठे यश मिळवून देऊ शकतो. परदेश प्रवासाचे नियोजन करत असाल, तर आजचा दिवस अनुकूल आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)






