किती दिवस बसचे धक्के खाणार? 39 हजारांमध्ये घरी आणा Bike, भारतातल्या टॉप स्वस्त 5 बाईक्स
- Published by:Sachin S
Last Updated:
गावातल्या गावात प्रवास करायचा म्हटलं तर रिक्षा किंवा टॅक्सीसाठी जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे प्रत्येक जण ऑफिसला जाण्यासाठी एखादी बाईक विकत घेत असतो.
सध्या वाढलेली महागाई आणि त्याच पेट्रोलचे दर यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं पार मोडलं आहे. त्यातच गावातल्या गावात प्रवास करायचा म्हटलं तर रिक्षा किंवा टॅक्सीसाठी जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे प्रत्येक जण ऑफिसला जाण्यासाठी एखादी बाईक विकत घेत असतो. भारतात सध्या बजाज, हिरो, होंडा आणि टीव्हीएस मोटर्समध्ये स्वस्त बाईक देण्यासाठी चाांगलीच स्पर्धा रंगली आहे. त्याच TVS मोटर्सच्या ५ अशा बाईक आहे, ज्या प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसणाऱ्याा आहेत.
advertisement
TVS XL 100 - ही भारतामधील सर्वात स्वस्त आणि मस्त अशी बाईक आहे. सध्या या बाईकची किंमत एक्स-शोरूम किंमत 44,550 रुपयांपासून सुरू होते. या बाइकमध्ये 99.7cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे, जे 4.3 bhp पॉवर आणि 4.5 Nm टॉर्क जनरेट करते. आता कमी सीसी इंजिन असल्यामुळे सहज 60-70 किमी इतकं मायलेज मिळलं. त्यामुळे ग्रामीण भागात प्रवासाासाठी हे ही एक बेस्ट बाईक आहे.
advertisement
TVS Radeon - टीव्हीएस मोटर्सही ही एक दमदार अशी बाईक आहे. या बाईकची किंमत एक्स-शोरूम किंमत 55,100 रुपयांपासून सुरू होते. या बाइकमध्ये 109.7cc इंजिन आहे जे 8.19 PS पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क जनरेट करते. यात i-Touchstart सिस्टम, LED डे-टाइम रनिंग लाइट्स, डिजिटल-एनालॉग कन्सोल आणि चांगली सीटिंग आहे. मायलेज सुमारे 73-75 किमी इतकं देते.
advertisement
TVS Sport ही आतापर्यंतची स्टायलिश आणि रुबाबदार अशी बाइक आहे. या बाईकची किंमत 55,500 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. 109.7cc इंजिन असलेली ही बाईक सुमारे 8 bhp पॉवर जनरेट करते. या बाइकचं खास फिचर्स म्हणजे, 80 किमी इतकं मायलेज देते. या बाइकमध्ये एनालॉग मीटर, ड्रम ब्रेक आणि सर्वसाधरण चांगले फिचर्स आहे.
advertisement
TVS Star City Plus - टीव्हीएस मोटर्सही आतापर्यंतची मार्केटमध्ये एक हाती राज्य करणारी TVS Star City सीरिजमधली ही बाईक आहे. या बाईकची किंमत 72,500 रुपयांपासून सुरू होते. ही एक 109.7cc इंजिनसह येते आणि ETFi (EcoThrust Fuel Injection) टेक्नॉलॉजीमुळे मायलेज तब्बल 80-85 किमी इतकं देते. जे ११० सीसी सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त आहे. या बाईकमध्ये चांगलं सीट, सस्पेंशन आणि मजबूत अशी फ्रेम दिली आहे. ज्यामुळे लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी बेस्ट आहे.
advertisement
advertisement






