कारमध्ये बसल्यावर AC कधी चालू केला पाहिजे? तुम्ही ही चूक तर करत नाही ना?
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
कुठेही जायचं असेल तर कोणीही आपल्या कारला पसंती देतं. त्याचं मुख्य कारण कारचा एसी हे आहे.
advertisement
बाहेर ऊन लागत असताना कारमधून निघालेली व्यक्ती सगळ्यात आधी कुठलं काम करत असेल तर ते म्हणजे एसी चालू करणं. घामाच्या धारा लागणाऱ्या उन्हातून कारमध्ये बसताच एसी सुरू करणं हे अगदी नैसर्गिक झालं आहे. या कृतीमुळे लगेच गारवा मिळतो हे खरं असलं तरी तुमच्या आरोग्यासाठी ते अजिबात योग्य नाही, हे तुम्ही जाणता का?
advertisement
advertisement
तज्ज्ञ सांगतात, “तुम्ही कार उन्हात पार्क करता आणि त्यात जाऊन बसता तेव्हा खूप गरम होतं. त्यामुळे तुमचा हात आपोआप एसीच्या बटणाकडे जातो आणि तुम्ही एसी सुरू करता; पण मी एक डॉक्टर असल्यामुळे असं न करण्याचा सल्ला देईन. तुमच्या फुप्फुसांच्या तापमानापेक्षा तुमच्या कारचं तापमान जास्त असतं. त्यामुळे तुमच्या फुप्फुसांना इजा होऊ शकते. म्हणूनच लगेच एसी सुरू करू नका.”
advertisement
तुम्हाला धुळीच्या ॲलर्जीचा त्रास असेल तर कारमध्ये बसताच एसी सुरू करणं हिताचं नाही. कारच्या खिडक्या उघडा. आतलं तापमान थोडं थंड व्हायची वाट बघा. त्यानंतर एसी सुरू करा. डॉक्टर सांगतात, “कारच्या आतल्या हवेत शुष्कपणा असतो, धूळही असते. एसी व्हेंट नियमित साफ केलेला नसेल तर त्यात धूळ साचण्याची शक्यता जास्त असते.
advertisement
advertisement
advertisement