PHOTOS : नवव्या पिढीतील या कलाकाराचा बॉलिवूडमध्ये डंका, संजय लीला भन्साळी, प्रितम दासोबतही केलं काम

Last Updated:
अनेक जण उच्च शिक्षण घेतात. मोठ्या पदावर जातात. मात्र, काही जण असे असतात, जे कमी शिक्षण घेऊनही आयुष्यात यश मिळवतात. आज असेच एका फक्त नववी शिकलेल्या एका कलाकाराबाबत आपण जाणून घेणार आहोत. (अंकित राजपूत, प्रतिनिधी)
1/6
राजस्थानच्या भूमीला कला संस्कृतीची धरती म्हटले जाते. यामध्ये नुकतेच जयपुर येथील रहिवासी असलेल्या पद्मश्री सारंगी वादक मोइनुद्दीन खान यांना राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मोइनुद्दीन खान यांना सारंगी वाजवण्यासाठी जगभरात ओळखले जाते. वयाच्या 5 व्या वर्षापासून त्यांनी त्यांचे वडील उस्ताद महबूब खान यांच्यापासून सारंगीचे शिक्षण घेतले आणि आज ते एक उत्कृष्ट सारंगीवादक बनले. आतापर्यंत त्यांनी फ्रान्स, डेन्मार्क, ओमान, इजिप्त, इंग्लंड सारख्या अनेक देशांमध्ये त्यांनी कार्यक्रम सादर केले आहेत. त्यांना 2014 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

advertisement
2/6
पद्मश्री मोइनुद्दीन खान हे सांगतात की, पिढ्यानपिढ्या त्यांच्या कुटुंबात सारंगी कलाकार तयार होत आहेत. जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या कानात सर्वात आधी सारंगीची धून वाजवण्यात आली. आमचे पूर्वज राजा महाराजांचा दरबारात सारंगी वाजवायचे. आमच्या कुटुंबापासून संपूर्ण राज्यात सारंगीच्या कलेचा विस्तार झाला. सारंगीवादक म्हणून सर्वात आधी मला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच राज्य स्तरावरही मला शेकडो पुरस्कार मिळाले आहेत.

3/6
मोइनुद्दीन खान यांचा मुलगा मोमिन खान यांना आपल्या वडिलांकडून वारशात सारंगीचे शिक्षण मिळाले. मोमिन खान आता त्यांच्या वडिलांचा वारसा पुढे नेत आहेत. मोमिन खान आपल्या कुटुंबातील नवव्या पिढीतील सारंगीवादक आहेत. त्यांच्या पूर्वजांनी सुरुवातीच्या काळात खूप नाव कमावले. तसेच सारंगीच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले.

4/6
मोमिन खानचे वडील मोईनुद्दीन खान सांगतात की, मोमिनला त्यांनी आपल्या वडिलांची 150 वर्षे जुनी असलेल्या सारंगीपासून सारंगी वाजवणे शिकवले. बॉलिवूडमध्येही त्याचा डंका वाजत आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची वेब सीरिज हिरा मंडीमध्ये मोमिन यांनी सारंगीची धुन दिली आहे. याआधीही त्यांनी पीपा, मैदान आणि अनेक बॉलिवूड चित्रपटात संगीत दिले आहे.

5/6
मोमिन जे सारंगी वाजवतात, ते त्यांना वडीलांपासून मिळाली आहे. ही सारंगी 150 वर्षे जुनी आहे. मोमिन यांच्या वडिलांनी सांगितले की, मोमिन राजस्थानचे सर्वात कमी वयातील पहिले सारंगी वादक आहेत. मोमिन यांची आजी मेहरू निशा या सारंगीला पाकिस्तानातून घेऊन आल्या होत्या आणि त्यांनी मोमिन यांचे वडील पद्मश्री उस्ताद मोइनुद्दीन खान यांना ही सांरगी दिली होती.

6/6
मोमिन खान यांनी बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत सादरीकरण केले आहे. मोमिन खान, अरिजीत सिंह, प्रितम दा यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी लाइव्ह कॉन्सर्ट केले आहे. तसेच आगामी काळातही बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या सारंगीची धून ऐकायला मिळणार आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement