'हर्षची इच्छा आहे की...' दुसऱ्यांदा आई झाल्यावर भारती सिंग घेणार तिसरा चान्स? डिलिव्हरीआधीच सांगितलं होतं कारण

Last Updated:
Harsh Limbachiyaa-Bharti Singh: भारतीला पुन्हा मुलगा झाला ही बातमी बाहेर येताच तिच्या एका जुन्या व्हिडिओची चर्चा आता रंगू लागली आहे.
1/10
मुंबई: टीव्ही विश्वातील सर्वात लाडकी जोडी, जिने आपल्या विनोदाने अख्ख्या देशाला हसवलं, त्या भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरात सध्या आनंदाला उधाण आलं आहे. 'लाफ्टर क्वीन' भारती दुसऱ्यांदा आई झाली असून तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

advertisement
2/10
ही गोड बातमी समोर येताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. विशेष म्हणजे, भारतीने स्वतः ही बातमी अधिकृतपणे सांगण्याआधीच तिच्या मित्रांनी सेटवर पेढे वाटून जल्लोष साजरा केला आहे.

3/10
भारती सध्या 'लाफ्टर शेफ' या शोमध्ये दिसत आहे. त्यामुळे ही गोड बातमी मिळताच शोच्या सेटवर सध्या दिवाळीसारखं वातावरण आहे. प्रसिद्ध अभिनेता अली गोनी याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पापाराझींना पेढे वाटताना आनंदाने ओरडतोय,
भारती सध्या 'लाफ्टर शेफ' या शोमध्ये दिसत आहे. त्यामुळे ही गोड बातमी मिळताच शोच्या सेटवर सध्या दिवाळीसारखं वातावरण आहे. प्रसिद्ध अभिनेता अली गोनी याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पापाराझींना पेढे वाटताना आनंदाने ओरडतोय, "आम्ही मामा झालो! अभिनंदन, मुलगा झालाय!"
advertisement
4/10
अलीसोबतच कृष्णा अभिषेक, जन्नत जुबैर, तेजस्वी प्रकाश आणि ईशा मालवीय यांनीही 'मामा-मावशी' झाल्याचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा केला.
अलीसोबतच कृष्णा अभिषेक, जन्नत जुबैर, तेजस्वी प्रकाश आणि ईशा मालवीय यांनीही 'मामा-मावशी' झाल्याचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा केला.
advertisement
5/10
भारतीच्या घरी पुन्हा मुलगा झाला ही बातमी बाहेर येताच तिच्या एका जुन्या व्हिडिओची चर्चा आता रंगू लागली आहे. काही दिवसांपूर्वी भारती आणि हर्षने त्यांच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्रेशी गप्पा मारल्या होत्या. यावेळी या जोडप्याने एक अशी कबुली दिली होती, जी ऐकून सोनालीदेखील थक्क झाली होती.
भारतीला पुन्हा मुलगा झाला ही बातमी बाहेर येताच तिच्या एका जुन्या व्हिडिओची चर्चा आता रंगू लागली आहे. काही दिवसांपूर्वी भारती आणि हर्षने त्यांच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्रेशी गप्पा मारल्या होत्या. यावेळी या जोडप्याने एक अशी कबुली दिली होती, जी ऐकून सोनालीदेखील थक्क झाली होती.
advertisement
6/10
हर्ष आणि भारतीला एक मुलगी हवी होती. भारतीने गंमतीत म्हटलं होतं की,
हर्ष आणि भारतीला एक मुलगी हवी होती. भारतीने गंमतीत म्हटलं होतं की, "हर्षची जिद्द आहे की जोपर्यंत मुलगी होत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. जर दुसऱ्यांदा मुलगा झाला, तर आम्ही तिसऱ्या बाळासाठीही प्रयत्न करू."
advertisement
7/10
यावर हर्षनेही दुजोरा दिला होता की,
यावर हर्षनेही दुजोरा दिला होता की, "मुलगा असो वा मुलगी, आम्हाला बाळ हवंच होतं. पण मला एक परी हवी आहे, त्यामुळे मुलगा झाला तर मुलीसाठी आमचा प्रयत्न सुरूच राहील."
advertisement
8/10
भारतीने पुढे चिडवत म्हटलं होतं की,
भारतीने पुढे चिडवत म्हटलं होतं की, "माझा नवरा तर म्हणतोय की तिसराही मुलगा झाला तरी आपण चौथ्या वेळेस प्रयत्न करू, जोपर्यंत माझ्या तब्येतीला झेपतंय तोपर्यंत हे सुरूच राहील!"
advertisement
9/10
भारती आणि हर्षचा मोठा मुलगा 'लक्ष' (गोला) हा आधीच सोशल मीडियाचा सुपरस्टार आहे. आता त्याच्या सोबतीला छोटा भाऊ आल्याने लिंबाचिया कुटुंबात स्टार्सची संख्या वाढली आहे. जरी या दोघांना मुलगी हवी असली, तरी आपल्या दुसऱ्या मुलाच्या आगमनाने दोघेही कमालीचे खुश आहेत.

10/10
सध्या भारतीच्या अधिकृत पोस्टची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण एक मात्र नक्की, भारतीच्या या दुसऱ्या मुलाच्या आगमनाने 'लाफ्टर शेफ'च्या टीमला पार्टी करण्यासाठी मोठं कारण मिळालं आहे.
सध्या भारतीच्या अधिकृत पोस्टची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण एक मात्र नक्की, भारतीच्या या दुसऱ्या मुलाच्या आगमनाने 'लाफ्टर शेफ'च्या टीमला पार्टी करण्यासाठी मोठं कारण मिळालं आहे.
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement