एका चुकीमुळं बरबाद झालं कपूर घराण्यातील या अभिनेत्याचं करिअर; आता करतो साईड रोल
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
बॉलिवूडमध्ये अनेक भावंडानी सोबत एंट्री घेतली आणि नाव कमावलं. पण त्यातला एक हिट झाला आणि दुसऱ्याला अपयश भोगावं लागलं. आज आम्ही तुम्हाला अशा एका बॉलिवूड अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याचे दोन्ही भाऊ आजही इंडस्ट्रीत खूप नाव कमावतायत, पण त्याला यश मिळालं नाही. हा अभिनेता आहे संजय कपूर. संजयने करिअरच्या सुरुवातीच्या काळात बॉक्स ऑफिसवर अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले, परंतु 2003 मध्ये त्याच्याकडून एक मोठी चूक झाली ज्यामुळे त्याने एक ब्लॉकबस्टर चित्रपट गमावला आणि त्यानंतर त्याच्या करिअरला गळती लागली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पण 'तेरे नाम' या चित्रपटासाठी सलमान खान नाही तर आधी संजय कपूरचा विचार झाला होता. जेव्हा अनुराग कश्यप हा चित्रपट दिग्दर्शित करत होता आणि त्याने या चित्रपटासाठी सर्वप्रथम संजय कपूरला संपर्क केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय कपूरने काही कारणास्तव हा चित्रपट करण्यास नकार दिला होता, त्यानंतर सलमान खानला या चित्रपटाची ऑफर मिळाली.
advertisement
advertisement