advertisement

Prarthana Behere: मुलगा निवडला, बोलणीही झाली, पण... 'पवित्र रिश्ता'मुळे मोडलेलं प्रार्थना बेहेरेचं लग्न; असं नेमकं झालेलं तरी काय?

Last Updated:
Prarthana Behere: चक्क एका हिंदी मालिकेच्या करारामुळे प्रार्थनाला तिचं ठरलेलं लग्न मोडावं लागलं होतं, असा खुलासा तिने नुकताच एका मुलाखतीत केला आहे.
1/9
मराठी चित्रपटसृष्टीतील 'बबली गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आज घराघरात लोकप्रिय आहे. 'मितवा' असो किंवा 'माझी तुझी रेशीमगाठ', प्रार्थनाने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

2/9
पण आज यशाच्या शिखरावर असलेल्या प्रार्थनाच्या आयुष्यात अशी वेळ आली होती, जिथे तिला संसार आणि करिअर यापैकी एकाची निवड करायची होती. चक्क एका हिंदी मालिकेच्या करारामुळे प्रार्थनाला तिचं ठरलेलं लग्न मोडावं लागलं होतं, असा खुलासा तिने नुकताच एका मुलाखतीत केला आहे.

3/9
प्रार्थना बेहेरे अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी एक पत्रकार म्हणून कार्यरत होती. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलाखती घेणाऱ्या प्रार्थनाला पाहून अनेकजण तिला तू अभिनयात का नशीब आजमावत नाहीस? असं विचारायचे.

4/9
योगायोगाने तिने या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि तिला पहिली मोठी संधी मिळाली ती म्हणजे एकता कपूरची 'पवित्र रिश्ता' ही मालिका. पण ही संधी सोपी नव्हती, कारण त्याच काळात तिचं घरच्यांनी लग्न जमवलं होतं.

5/9
'आरपार'ला दिलेल्या मुलाखतीत प्रार्थनाने त्यावेळचा प्रसंग सांगितला. ती म्हणाली,
'आरपार'ला दिलेल्या मुलाखतीत प्रार्थनाने त्यावेळचा प्रसंग सांगितला. ती म्हणाली, "आई-बाबांना वाटत होतं की आता शिक्षण झालंय, नोकरी आहे तर लग्नाचं बघावं. त्यांनी माझ्यासाठी एक लंडनचं स्थळ शोधलं होतं. ते अरेंज मॅरेज होतं आणि मी त्या मुलाला पाहिलंही नव्हतं. मी लग्नासाठी होकार दिला होता. पण त्याच वेळी मला 'पवित्र रिश्ता'ची ऑफर आली. जेव्हा मी मालिकेचा करार वाचला, तेव्हा त्यात एक अट होती की पुढील ३ वर्षे मी लग्न करू शकत नाही आणि गरोदर राहू शकत नाही."
advertisement
6/9
प्रार्थनासमोर आता पेच होता. तिने आईला स्पष्ट सांगितलं,
प्रार्थनासमोर आता पेच होता. तिने आईला स्पष्ट सांगितलं, "आई, आता मी ३ वर्ष लग्न करू शकत नाही, तू त्या मुलाला 'नाही' म्हणून सांग." आई सुरुवातीला गोंधळली, पण प्रार्थनाने जेव्हा विचारलं की, "तुला काय हवंय? मी माझं करिअर करावं की लग्न करून सेटल व्हावं?" तेव्हा तिचे वडील तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.
advertisement
7/9
प्रार्थना सांगते की, जर तिला ती मालिका मिळाली नसती, तर आज ती लंडनमध्ये एखाद्या गृहिणीचं आयुष्य जगत असती. तिने स्टॅटिस्टिक्स (Statistics) मधून पदवी घेतली आहे आणि ती भरतनाट्यम विशारदही आहे.

8/9
 "जरी मी लंडनला गेले असते, तरी तिथे काही ना काही काम करून स्वतःचा खर्च भागवला असता. पण नशिबात अभिनय आणि हे ग्लॅमरचं जग लिहिलेलं होतं," असं ती मिश्किलपणे म्हणाली.

9/9
आज प्रार्थना मराठी सिनेसृष्टीतील एक मोठं नाव आहे. सध्या ती तिच्या 'अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या या प्रवासाकडे पाहताना लक्षात येतं की, कधीकधी एक कठोर निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो.

सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement