Priya Bapat : 'तरी गिरीजा ओक 100 मतांनी आघाडीवर', फोटो प्रिया बापटचा, पण चाहत्यांना नॅशनल क्रशचीच भुरळ

Last Updated:
Priya Bapat Photo : अभिनेत्री गिरीजा ओकचे ब्लू साडीतील फोटो व्हायरल होत असताना अभिनेत्री प्रिया बापट हिने शेअर केलेल्या साडीतल्या फोटोंवर चाहत्यांच्या भन्नाट कमेन्ट पाहायला मिळत आहेत.
1/7
मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडिया सेन्सेशन बनली आहे. गिरीजा ओकचे निळ्या साडीतील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेत.

advertisement
2/7
एका मुलाखतीत बोलताना गिरीजाने दिलेलं एक उत्तर आणि तिचा साधेपणा सगळ्यांना भावला. गिरीजाचे निळ्या साडीतील फोटो इतके व्हायरल झाले की ती रातोरात नॅशनल क्रश बनली.

3/7
एकीकडे गिरीजा ओकचे निळ्या साडीतील फोटो व्हायरल होत असताना दुसरीकडे अभिनेत्री प्रिया बापटने देखील तिचे गुलाबी साडीतील फोटो शेअर केले. प्रियाला गुलाबी साडीत पाहून नेटकऱ्यांनी तिच्या फोटोवर भन्नाट कमेंट केल्या आहेत.

4/7
प्रिया बापटचा 'असंभव' हा मराठी सिनेमा लवकरच रिलीज होतोय. नैनीतालच्या निसर्गरम्य ठिकाणी या सिनेमाचं शूटींग झालं. 'असंभव' सिनेमाच्या सेटवरचे फोटो प्रियाने शेअर केलेत.

5/7
 "0°C तापमान असलं तरी लूक मात्र 100% फायर!" असं कॅप्शन देत प्रियाने तिचे गुलाबी साडीतील फोटो शेअर केलेत. या फोटोवर एका चाहत्यानं भन्नाट कमेन्ट करत तिची तुलना अभिनेत्री गिरीजा ओकच्या निळ्या साडीशी केली आहे.

6/7
प्रियाच्या फोटोवर एका युझरने कमेंट करत लिहिलंय,
प्रियाच्या फोटोवर एका युझरने कमेंट करत लिहिलंय, "तरी पन.... गिरीजा ओक गोडबोले 100 मतांनी आघाडीवर". ही कमेन्ट चांगलीच चर्चेत आली आहे. तर अनेक चाहत्यांनी हार्ट इमोजी पोस्ट करत प्रियाच्या फोटोंना पसंती दिली आहे.
advertisement
7/7
अभिनेत्री गिरीजा ओक आणि प्रिया बापट दोघीही सध्याच्या मराठीतील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. दोघींहीनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली. फक्त सिनेमा नाही तर दोघींनी ओटीटी विश्वातही आपली नवी ओळख निर्माण केली आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement