Budget Travel : स्वच्छ नद्या, समुद्रकिनारे, पर्वत; भारतापासून फक्त 3 तासांच्या अंतरावर आहे 'हा' सुंदर देश!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Best budget travel destination : परदेशात फिरायचं स्वप्न अनेकांचं असतं, पण बजेटचा प्रश्न आड येतो. मात्र भारतापासून अवघ्या 3 तासांच्या फ्लाइट डिस्टन्सवर असलेला एक सुंदर देश आहे, जिथे निसर्ग, समुद्रकिनारे, डोंगर, वाळवंट आणि स्वच्छ नद्या एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. विशेष म्हणजे या देशाची पूर्ण ट्रिप तुमच्या बजेटमध्ये होऊ शकते. बजेट आणि अनुभव दोन्ही दृष्टीने हा देश एक उत्तम ट्रॅव्हल डेस्टिनेशन ठरतो.
आपण ज्या देशाबद्दल बोलत आहोत तो म्हणजे ओमान. ओमान हा दक्षिण-पश्चिम आशियातील अरब द्वीपकल्पाच्या आग्नेय टोकाला वसलेला देश आहे. त्याच्या सीमा सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि येमेनशी जोडलेल्या आहेत. तसेच अरब सागर आणि ओमानच्या आखातालाही हा देश लागून आहे. ओमानची राजधानी मस्कट असून हा देश शांत, सुरक्षित आणि पर्यटनासाठी अतिशय लोकप्रिय आहे.
advertisement
advertisement
ओमानसाठी फ्लाइट तिकिटांचे दर साधारण 5,000 रुपयांपासून सुरू होतात, जे एअरलाईननुसार बदलू शकतात. पर्यटनासाठी टुरिस्ट व्हिसा आवश्यक असून त्याचा खर्च प्रति व्यक्ती सुमारे 4,500 रुपये येतो. साधारण एका आठवड्यात व्हिसा मिळतो. ओमानमध्ये 5 दिवस फिरण्यासाठी एकूण खर्च साधारण 30 ते 40 हजार रुपयांच्या दरम्यान येतो.
advertisement
राहण्याचा विचार केला तर 5 दिवसांसाठी हॉटेलचा खर्च साधारण 7,500 रुपये येतो, म्हणजे प्रति दिवस प्रति व्यक्ती अंदाजे 1,500 रुपये. जर तुम्ही कार भाड्याने घेतली तर एका दिवसाचा खर्च सुमारे 1,000 रुपये येतो आणि पेट्रोलसाठी साधारण 1,500 रुपये खर्च येऊ शकतो. जेवणाचा खर्च देखील फारसा जास्त नाही. साधारणपणे 300 रुपयांत एका दिवसाचं जेवण आरामात होऊ शकतं.
advertisement
ओमानमध्ये फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. राजधानी मस्कट, ऐतिहासिक निझवा, निसर्गरम्य वादी अल साब आणि सुंदर दायमानियत आयलंड ही ठिकाणे खास पाहण्यासारखी आहेत. येथे वॉटर अ‍ॅक्टिव्हिटीज, स्नॉर्केलिंग, बोट राईड आणि रेंटवर कार चालवण्याचा अनुभव घेता येतो. साहसी उपक्रमांसाठी वेगळे अंदाजे 10 हजार रुपये राखून ठेवले तर उत्तम.
advertisement
ओमानला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते एप्रिल हा कालावधी सर्वोत्तम मानला जातो. या काळात हवामान आल्हाददायक असते आणि फारशी थंडीही नसते. योग्य नियोजन केल्यास तुमची संपूर्ण ओमान ट्रिप साधारण 40 हजार रुपयांत पूर्ण होऊ शकते. त्यामुळे बजेटमध्ये, UAE जवळील आणि परदेशाचा अनुभव घ्यायचा असेल, तर ओमान हे नक्कीच एक उत्तम ट्रॅव्हल डेस्टिनेशन ठरू शकते.
advertisement









