कोल्हापूरच्या महिलेचा अनोखा फंडा, आता कोणतीही भाजी बनणार फक्त 2 मिनिटांत

Last Updated:
कोल्हापुरातील शीतल देशमुख यांनी घरगुती व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे कोणतीही भाजी अगदी दोन मिनिटांत तयार होणार आहे.
1/7
 चविष्ट आणि चमचमीत भाजीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक असतो त्या भाजीसाठी वापरलेली ग्रेव्ही. पण ग्रेव्ही असणारी भाजी बनवायची म्हटलं की आधी ग्रेव्ही बनवण्याची तयारी करावी लागते. मात्र  एका महिलेच्या घरगुती व्यवसायामुळे कोणतीही भाजी अगदी 2 मिनिटांत बनवता येणार आहे. गृहिणी शीतल देशमुख या घरातच ग्रेव्ही पावडर बनवून विकत आहेत. विशेष म्हणजे त्यांची ही रेडिमेड ग्रेव्ही विविध प्रकारांतही उपलब्ध आहे.
चविष्ट आणि चमचमीत भाजीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक असतो त्या भाजीसाठी वापरलेली ग्रेव्ही. पण ग्रेव्ही असणारी भाजी बनवायची म्हटलं की आधी ग्रेव्ही बनवण्याची तयारी करावी लागते. मात्र कोल्हापुरातील एका महिलेच्या घरगुती व्यवसायामुळे कोणतीही भाजी अगदी 2 मिनिटांत बनवता येणार आहे. गृहिणी शीतल देशमुख या घरातच ग्रेव्ही पावडर बनवून विकत आहेत. विशेष म्हणजे त्यांची ही रेडिमेड ग्रेव्ही विविध प्रकारांतही उपलब्ध आहे.
advertisement
2/7
कोल्हापुरातील देवकर पाणंद परिसरात राहणाऱ्या शीतल देशमुख या एक गृहिणी आहेत. त्यांचे पती पेशाने डॉक्टर आहेत. मुलीच्या शिक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्राबाहेर गेल्यावर शीतल यांनी ड्राय ग्रेव्ही पावडर बनवण्याचा एक शॉर्ट कोर्स केला होता. त्याचाच फायदा त्यांना स्वतःच्या घरी झाला.

3/7
घरी पटकन एखादी भाजी बनवण्यासाठी म्हणून त्यांनी ग्रेव्ही पावडर बनवून ठेवली होती. पुढे याचाच घरगुती व्यवसाय करण्याची कल्पना डोक्यात आल्याचे शीतल यांनी सांगितले.

4/7
शीतल यांच्याकडे सध्या चार प्रकारच्या ग्रेव्ही पावडर आहेत. लाल ग्रेव्ही पावडर, कोल्हापुरी बटर चिकन ग्रेव्ही पावडर, पांढरी ग्रेव्ही पावडर आणि जैन ग्रेव्ही पावडर या चार प्रकारच्या ग्रेव्ही पावडर शितल 50 ग्राम पॅकेटमध्ये विकतात. यामधील लाल ग्रेव्ही पावडर वापरून व्हेज हंडी, पनीर बटर, दम आलू, कोफ्ते बनवता येतात.

5/7
कोल्हापुरी बटर चिकन ग्रेव्ही वापरुन चविष्ट बटर चिकन, तर पांढरी ग्रेव्ही पावडर वापरून काजू कुर्मा, मलई कोफ्ता, मेथी मलई मटर असे पदर्थ बनवता येऊ शकतात. नवीनच बनवलेली जैन ग्रेव्ही पावडर वापरून देखील विविध जैन पद्धतीच्या भाज्या बनवता येऊ शकतात, अशी माहिती शीतल यांनी दिली आहे.

6/7
शीतल यांच्याकडे मिळणारी ग्रेव्ही पावडर त्या स्वतःच घरी बनवतात. या ग्रेव्ही पावडर वापरून भाजी बनवताना अगदी सोप्या पद्धतीने भाजी बनवता येते. तर घरगुती पद्धतीने ही ग्रेव्ही पावडर बनवताना त्यामध्ये काजू, मगज बी, गरम मसाले भाजून सर्व घटक मिक्सर मध्ये बारीक केले जातात. कोणत्याही प्रकारचे संरक्षक घटक वापरले गेले नसले तरी पुढे साधारण 3 महिने ही ग्रेव्ही पावडर टिकते, असेही शीतल देशमुख यांनी सांगितले.

7/7
शीतल देशमुख या 50 ग्रॅम ग्रेव्ही पावडरची विक्री 60 आणि 70 रुपयांना करतात. स्वतःसाठी म्हणून शिकून घेतलेल्या कलेचा त्यांनी व्यवसायासाठी वापर करुन घेतला आहे. त्यांना या व्यवसायातून चांगला नफाही मिळत आहे. मात्र, त्यांच्या या रेडिमेड ग्रेव्हीचा अनेकांना झटपट रेसिपी बनवण्यासाठी फायदा होत आहे. (साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement