पुण्यात काँग्रेस-ठाकरे गटाची युती जाहीर, फॉर्म्युलाही ठरला, कुणाला किती जागा मिळणार?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुण्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यानंतर काँग्रेसनं ठाकरे गट आणि मनसेसोबत युतीची घोषणा केली आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली.
पुणे महानगर पालिका निवडणुकीसाठी शरद पवार गटाने अजित पवार गटाशी युती केली आहे. पुण्यात सुरुवातीपासून महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढली जाईल, असं बोललं जात होतं. तशा बैठका देखील पार पडल्या. अजित पवारांना महाविकास आघाडीत घेण्याबाबत चर्चाही झाल्या. पण अजित पवारांना सोबत घेण्यास काँग्रेसनं कडाडून विरोध केला.
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास पुण्यात काँग्रेस काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र आता पुण्यातील चित्र स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यानंतर काँग्रेसनं ठाकरे गट आणि मनसेसोबत युतीची घोषणा केली आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली.
advertisement
या पत्रकार परिषदेत त्यांनी जागावाटपांचा फॉर्म्युला देखील जाहीर केला आहे. सध्याच्या घडीला पुणे महापालिकेत १६५ पैकी १०५ जागांचा निर्णय झाला आहेत. यातील ६० जागांवर काँग्रेस तर ४५ जागांवर शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढवणार आहे. उर्वरित ५० जागांवर उद्यापर्यंत निर्णय होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात ८०-६५-२० असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. इथं काँग्रेसला ८० जागा, ठाकरे गटाला ६५ जागा सोडण्यात आल्या आहेत. तर २० जागा मित्र पक्षांना राखीव ठेवण्यात आल्या आहेत. इतर लहान मोठे पक्ष काँग्रेस ठाकरे गट युतीसोबत आले तर त्यांच्यासाठी या जागा ठेवल्याची चर्चा आहे. मनसेला ठाकरे गटाच्या कोट्यातून जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. उद्यापर्यंत दुसरे कोणतीही मित्र पक्ष सोबत आले नाहीत. तर राखीव ठेवलेल्या २० जागा ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाटून घेतल्या जाणार आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 2:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुण्यात काँग्रेस-ठाकरे गटाची युती जाहीर, फॉर्म्युलाही ठरला, कुणाला किती जागा मिळणार?









