मक्याचे दाणे अन् चिली फ्लेक्स; तुम्ही कधी खाल्लीये का पिझ्झा पाणीपुरी? पाहा कुठे मिळतीय भन्नाट ही डिश
- Published by:News18 Marathi
Last Updated:
पाणीपुरी म्हटलं की, कोणाच्याही जिभेला पाणी सुटतं. या खाऊ गल्लीमध्ये ही पिझ्झा पाणीपुरी भलतीच फेमस आहे.
पाणीपुरी म्हटलं की, कोणाच्याही जिभेला पाणी सुटतं. पाणीपुरीचे तसे बरेच प्रकार आपण खाल्ले आणि पाहिले असतील पण तुम्ही कधी ‘पिझ्झा पाणीपुरी’ खाल्लीये का? मुंबईतील घाटकोपरच्या खाऊ गल्लीमध्ये ही पिझ्झा पाणीपुरी भलतीच फेमस आहे. घाटकोपर पूर्व भागातील विक्रांत सर्कलजवळ वसुंधरा इमारतीसमोर एक खाऊ गल्ली आहे.
advertisement
तिथल्या मिठाईलाल भेलवाला चाट कॉर्नरमध्ये तुम्हाला ही युनिक पिझ्झा चिज पाणीपुरी खायला मिळेल. या पिझ्झा पाणीपुरीची किंमत आहे 180 रुपये. किंमत जितकी जास्त आहे तितकीच ती चवीला भारी लागते. त्यात स्टफिंगही भरपूर असतं. दोन जणांना ही एक प्लेट पाणीपुरी सहज पुरते. त्यामुळे एकाच प्लेटमध्ये पिझ्झा आणि पाणीपुरी खाल्ल्याचा आनंद मिळतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement