advertisement

Health Tips : अकाली म्हातारं बनवतात हे 7 पदार्थ! चिरतरुण राहायचं असेल तर आत्ताच खाणं सोडा

Last Updated:
Foods That Make Your Skin Ages Faster : आपल्या एकूणच आरोग्यासाठी आपला आहार हा सर्वात महत्त्वाचा विषय असतो. आपला आहारर जितका चांगला तितके आपले आरोग्य उत्तम राहते. तुम्हाला जास्त काळ तरूण दिसायचे असेल किंवा राहायचे असेल तर तुमच्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगत आहोत, जे तुम्ही जास्त प्रमाणात खाल्ल्यास तुम्ही अकाली म्हणजेच लवकर म्हातारे दिसू शकता.
1/7
सोडा, एनर्जी ड्रिंक्स : तुम्ही जितके जास्त सोडा आणि एनर्जी ड्रिंक्स घेतल्यास तितक्या लवकर तुमच्या त्वचेच्या पेशी वृद्ध होतील. वेबएमडीच्या मते, त्यात भरपूर साखर असते, जी तोंडातील बॅक्टेरियासोबत मिळून आम्ल बनते आणि दत्तचे इनॅमल कमकुवत करते. यामुळे दात किडतात आणि वजनही झपाट्याने वाढते.

2/7
 फ्रोझन फूड : तुम्ही फ्रिजमध्ये गोठवलेले अन्न खाल्ल्यास तुमचे पोट भरते. मात्र त्यामध्ये भरपूर मीठ म्हणजेच सोडियम असते. यामुळे चेहरा आणि हातावर सूज येऊ शकते आणि तुम्ही फुगलेले दिसू शकता. त्यामुळे किडनी लवकर खराब होते, ज्याचा <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/skin-care-tips-is-using-soap-on-the-face-safe-for-the-skin-right-way-to-wash-your-face-mhpj-1171986.html">त्वचेवर वाईट परिणाम</a> होतो. अशा प्रकारे ते तुमच्या शरीराच्या वृद्धत्वाला गती देण्याचे काम करते.
फ्रोझन फूड : तुम्ही फ्रिजमध्ये गोठवलेले अन्न खाल्ल्यास तुमचे पोट भरते. मात्र त्यामध्ये भरपूर मीठ म्हणजेच सोडियम असते. यामुळे चेहरा आणि हातावर सूज येऊ शकते आणि तुम्ही फुगलेले दिसू शकता. त्यामुळे किडनी लवकर खराब होते, ज्याचा त्वचेवर वाईट परिणाम होतो. अशा प्रकारे ते तुमच्या शरीराच्या वृद्धत्वाला गती देण्याचे काम करते.
advertisement
3/7
अल्कोहोल : अल्कोहोलचे सेवन देखील त्वचेसाठी धोकादायक आहे. जेव्हा तुम्ही अल्कोहोल घेता, तेव्हा त्यामुळे निर्जलीकरण होते आणि त्वचेतील 63 टक्के पाण्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्वचा कोरडी आणि भेगा पडून सुरकुत्या पडण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

4/7
फ्राईड फूड : तुम्ही तळलेले अन्न जास्त प्रमाणात खाल्ले तर ते त्वचा लवकर परिपक्व होण्यास मदत करते. यामध्ये अशा अनेक गोष्टी विकसित होतात, ज्यामुळे त्वचेला झपाट्याने नुकसान होते आणि तुम्ही म्हातारे दिसू शकतात.

5/7
सॉस, चीज : सॉस आणि चीज हेदेखील त्वचेसाठी धोकादायक असतात. त्यात भरपूर साखर आणि मीठ टाकले जाते आणि त्यात सॅच्युरेटेड फॅटही वापरतात. ज्यामुळे त्वचा आणि अंतर्गत अवयवांमध्ये समस्या उद्भवतात.
सॉस, चीज : सॉस आणि चीज हेदेखील त्वचेसाठी धोकादायक असतात. त्यात भरपूर साखर आणि मीठ टाकले जाते आणि त्यात सॅच्युरेटेड फॅटही वापरतात. ज्यामुळे त्वचा आणि अंतर्गत अवयवांमध्ये समस्या उद्भवतात.
advertisement
6/7
 चहा, कॉफी : चहा आणि कॉफी जास्त प्रमाणात पिताना काळजी घ्या. यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. याच्या अतिसेवनाने डिहायड्रेशनची समस्या वाढते आणि त्वचेतून विषारी पदार्थ बाहेर पडणे थांबते. त्यामुळे <a href="https://news18marathi.com/lifestyle/how-to-use-ice-on-face-know-the-best-time-and-way-to-apply-ice-on-skin-mhpp-1165785.html">कोरडी त्वचा</a>, सुरकुत्या इत्यादी समस्या वाढू शकतात.
चहा, कॉफी : चहा आणि कॉफी जास्त प्रमाणात पिताना काळजी घ्या. यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. याच्या अतिसेवनाने डिहायड्रेशनची समस्या वाढते आणि त्वचेतून विषारी पदार्थ बाहेर पडणे थांबते. त्यामुळे कोरडी त्वचा, सुरकुत्या इत्यादी समस्या वाढू शकतात.
advertisement
7/7
बाहेरचे बेक केलेले पदार्थ : स्वयंपाक करण्यासाठी बेकिंग हा एक चांगला पर्याय आहे, परंतु जर तुम्ही बाजारातून बेक केलेले पदार्थ विकत घेतले तर त्यात रिफाइंड मैदा, साखर, अस्वास्थ्यकर तेल इत्यादींचा वापर केला जातो, ज्याचे जास्त सेवन केल्याने त्वचेवर वेगाने वृद्धत्व येऊ शकते.

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement