Health Tips: गुडघेदुखीचा त्रास होतोय? हे करा घरगुती उपाय, मिळेल लगेच आराम
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
Knee Health: गुडघेदुखीचं प्रमाण वाढण्यामागे जीवनशैलीशी निगडीत विविध घटक कारणीभूत आहेत.
advertisement
advertisement
तज्ज्ञांच्या मते, गुडघेदुखीचं प्रमाण वाढण्यामागे चुकीची बैठकशैली, दीर्घकाळ बसून राहणे, व्यायामाचा अभाव तसेच वाढलेलं वजन हे घटक कारणीभूत आहेत. ग्रामीण भागात शेतमजुरीमुळे तर शहरी भागात बसून काम करण्याच्या पद्धतीमुळे गुडघ्यावर येणारा ताण समानच आहे. याशिवाय कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळं हाडं कमकुवत होतात.
advertisement
advertisement
advertisement
गुडघेदुखी वाढल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. डॉक्टर तपासणी करून आवश्यक असल्यास एक्स-रे किंवा एमआरआय करून अचूक निदान करतात. त्यानंतर औषधोपचार, फिजिओथेरपी, किंवा गुडघ्यात दिली जाणारी विशेष इंजेक्शन थेरपी सुचवली जाते. काही रुग्णांना कॅल्शियम, व्हिटॅमिन डी किंवा ग्लुकोसामिनसारखे सप्लिमेंट्स दिले जातात. मात्र, गुडघा पूर्ण झिजल्यास कृत्रिम गुडघा प्रत्यारोपण (Knee Replacement) हा अंतिम उपाय ठरतो.
advertisement


