मधुमेह आहे सावधान! तुमची एक चूक शरीरासाठी ठरेल घातक, हिवाळ्यात घ्या अशी काळजी
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
हिवाळ्याच्या दिवसांत अनेक आजार डोकं वर काढत असतात. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना आपलं आरोग्य जपावं लागतं.
advertisement
मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी हिवाळ्यात आहाराची योग्य ती काळजी घ्यावी लागते. साखरेचे पदार्थ टाळलेच पाहिजेत. जेवणात जास्त तेलकट, तुपकट खाणं टाळावं. जास्त कॅलरिजचा आहार घेऊ नये. आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा. जास्त फायबरयुक्त आहार घ्यावा. थंडीत तहान लागत नाही, तरीही पाणी भरपूर प्यावे. काकडीसारखे पदार्थ आवर्जून खावेत. प्रोटिनयुक्त पदार्थ हिवाळ्यात मिळणारी फळे खाल्ली पाहिजेत, असं डॉक्टर सांगतात.
advertisement
हिवाळ्यात थंडीच्या कडाक्यामुळे बऱ्याचदा घराबाहेर जायला नको वाटतं. अशा स्थितीत मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यांनी घरामध्ये बसूनच योगासने आणि प्राणायाम केले पाहिजे. नियमित व्यायाम केल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे.
advertisement
हिवळ्यात त्वचा करोडी पडण्याची समस्याना सर्वांनाच जाणवते. परंतु, मधुमेहाच्या रुग्णांत याचे प्रमाण अधिक असते. थंडीमुळे पायांना भेगा पडून जखमा देखील होतात. त्यामुळे जखम वाढल्यास मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं. शरीराला बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर लावावे. रात्री झोपताना पायांना तेल लावणंही फायदेशीर ठरू शकतो.
advertisement
advertisement








