‘मोहब्बत का शरबत’ने मिळेल उन्हाळ्यात शरीराला थंडावा, पण पिणं चांगलं की वाईट?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
उन्हाळ्यात मोहब्बत का शरबतला सर्वात जास्त पसंती दिली जाते, कारण त्यात असलेलं कलिंगडामुळे शरीराला ताजगी मिळते आणि तहान भागवली जाते.
‘मोहब्बत का शरबत’ हे पेय तरुणाईमध्ये खूपच प्रसिद्ध होत आहे. त्याच्या नावामुळेच अनेक लोक आकर्षित होतात. खरंतर, हे सरबत कलिंगड, दूध आणि साखर यांचं मिश्रण असतं, ज्यामुळे त्याला एक ताजा, गोड आणि चवदार स्वाद मिळतो. उन्हाळ्यात मोहब्बत का शरबतला सर्वात जास्त पसंती दिली जाते, कारण त्यात असलेलं कलिंगडामुळे शरीराला ताजगी मिळते आणि तहान भागवली जाते. परंतु, या गोड सरबताचा आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो? हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी कोल्हापुरातील डॉक्टर अविनाश शिंदे यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
advertisement
कलिंगडाचं आरोग्यदायक महत्त्व : कलिंगड हे एक अत्यंत पोषणयुक्त फळ आहे. त्यात पाणी, फायबर्स, व्हिटॅमिन्स आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. कलिंगड डोळ्यांचे, हाडांचे आणि हदयाचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त असतं. विशेषतः उन्हाळ्यात उष्णतेमुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते, पण कलिंगडाचे सेवन केल्यामुळे शरीरात हायड्रेशन राखले जाते. याशिवाय, कलिंगडामध्ये लाइकोपीन नावाचं शक्तिशाली अँटीऑक्सिडन्ट असतं, ज्यामुळे हृदयरोग आणि कॅन्सर सारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो.
advertisement
advertisement
पचनाशी संबंधित समस्या : ‘मोहब्बत का शरबत’ किंवा अन्य कोणत्याही सरबतात दूध आणि कलिंगड यांचं एकत्र सेवन करणं पचनासाठी हानिकारक ठरू शकतं. आयुर्वेदानुसार, दूध आणि कलिंगड यांचे मिश्रण विषारी ठरू शकतं, कारण हे एकत्र घेतल्यावर पचनशक्तीवर नकारात्मक परिणाम होतो. कलिंगड हे एक रसाळ फळ आहे, ज्यात पाणी आणि इतर पोषक तत्त्वं भरपूर असतात. दुसरीकडे, दूध हे कॅल्शियम आणि प्रोटीनच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. यामध्ये फॅट्स देखील असतात. हे दोन घटक एकत्र घेतल्यावर पचनशक्तीवर प्रभाव पडतो आणि पाचन क्रिया मंदावू शकते.
advertisement
advertisement
साखरेचा धोका: वजन वाढ आणि मधुमेह : ‘मोहब्बत का शरबत’ हे गोड सरबत आहे आणि त्यात साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. साखरेचं जास्त सेवन हे वजन वाढण्याचं मुख्य कारण ठरू शकतं. साखरेचा अधिक वापर केल्यास शरीरातील ग्लूकोज लेव्हल वाढते आणि ते थोड्या वेळाने इन्सुलिनच्या उत्पत्तीवर प्रभाव टाकू शकते. यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
advertisement
प्रमाणात घेणं गरजेचं : ‘मोहब्बत का शरबत’ हे एक स्वादिष्ट आणि ताजगी देणारे सरबत असलं तरी, त्याचं सेवन आरोग्याच्या दृष्टीने काळजीपूर्वक करावं. कलिंगडाचा रस आरोग्यासाठी चांगला असला तरी, त्यात असलेल्या साखरेचं प्रमाण, दूधाचा मिश्रण आणि पचनाशी संबंधित मुद्दे यांचा विचार केला पाहिजे. डॉक्टर अविनाश शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, सरबत सेवन करतांना साखरेचं प्रमाण कमी करणं आणि योग्य प्रमाणातच त्याचा आनंद घेणं महत्त्वाचं आहे.