Salt Intake : कोणते मीठ आरोग्यासाठी फायदेशीर? किती प्रमाणात खावं?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
Salt Intake : कोणताही पदार्थाला मिठाशिवाय चव येत नाही. जेवणात मीठ नसेल तर तो पदार्थ खायला चांगला लागत नाही.
advertisement
जेवण बनवताना पांढरा मिठाचा वापर हा मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे आपण कोणते मीठ खावं? कोणते मीठ किती प्रमाणात खावं? याबद्दलच छत्रपती संभाजीनगर मधील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
काळ्या मिठामध्ये सोडियम, कॅल्शिम, मॅग्नेशियम, लोह आहे. काळ्या मिठापेक्षा पांढऱ्या मिठामध्ये सोडियम जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे हृदय विकार किंवा उच्च रक्तदाबाचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. पांढऱ्या मिठापेक्षा काळ्या मिठामध्ये सोडियम प्रमाण कमी आहे. बाकीचे खनिजे पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्न जास्त आहे, असं अलका कर्णिक यांनी सांगितलं.
advertisement
advertisement
प्रत्येक व्यक्तीने दर दिवसाला काळे मीठ 5 ग्रॅम एवढं खावे. त्या पेक्षा जास्त खाऊ नये. पांढऱ्या मिठाची मात्र ही 3 ग्राम पेक्षा कमीच असायला. काळ्या मिठापेक्षा पांढरे मिठ चवीला चांगले असते. ते आपण जास्त खातो पण असं न करता दोन्ही मीठ कमीच प्रमाणात खावेत. नाही तर त्याचे वाईट परिणाम हे आपल्या शरीरावर हे होतात, असंही अलका कर्णिक सांगतात.