Identifying Original Sabudana : महाशिवरात्रीच्या उपवासासाठी आणलेला साबुदाणा नकली तर नाही ना? असं ओळखा..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Original v/s Fake Sabudana : उद्या महाशिवरात्री आहे. यादिवशी बहुतांशी लोक उपवास करतात. उपवासाला सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा. मात्र तुम्ही घरी आणलेला साबुदाणा शुद्ध आहे की नाही? तुम्ही हे तपासता का? बऱ्याचदा साबुदाणा भिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी एकत्र तो चांगला भिजत नाही. अशावेळी साबुदाणा शुद्ध आहे की नाही हा प्रश्न पडतो. पण काही टिप्सद्वारे साबुदाणा शुद्ध आहे की नाही हे तुम्ही सहज ओळखू शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
नकली साबुदाण्याचे दुष्परिणाम : नकली साबुदाणा बनवण्यासाठी अनेक रसायने, ब्लीचिंग एजंट, फॉस्फोरिक ॲसिड आणि सल्फ्यूरिक ॲसिडचा वापर केला जातो. याशिवाय हा साबुदाणा पांढरा करण्यासाठी त्यात अनेक प्रकारचे कृत्रिम पांढरे करणारे घटकही टाकले जातात. अशा परिस्थितीत नकली साबुदाणा खाल्ल्याने लिव्हर, किडनीशी संबंधित आणि इतर अनेक आजार होण्याचा धोका असतो.








