बेडरूममध्ये Indoor plants ठेवल्यास खरंच धोका असतो का? त्यामागचं वैज्ञानिक सत्य काय?
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
लोक घरात झाडे लावून ऑक्सिजनची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मनात एक प्रश्न येतो की, जास्त झाडे लावल्यास आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो का? किंवा...
advertisement
इनडोअर प्लांट्स (Indoor plants) केवळ सजावटीसाठी नाहीत, तर ते नैसर्गिक हवा शुद्धीकरण म्हणून काम करतात. ते हानिकारक वायू शोषून हवा स्वच्छ करतात. तुळस (Basil), कोरफड (Aloe vera), स्नेक प्लांट (Snake plant), अरेका पाम (Areca palm) आणि स्पायडर प्लांट यांसारखी झाडे घरातील ऑक्सिजन आणि हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी विशेषतः उपयुक्त आहेत.
advertisement
advertisement
बेडरूममध्ये झाडे ठेवणे धोकादायक आहे का? : तुम्ही अनेकदा ऐकले असेल की, झाडे रात्रीच्या वेळी ऑक्सिजनऐवजी कार्बन डायऑक्साइड (carbon dioxide) सोडतात आणि त्यामुळे बेडरूममध्ये झाडे ठेवणे धोकादायक (dangerous) असू शकते. काही तज्ञांचे म्हणणे आहे की, रात्रीच्या बाष्पीभवन (evaporation) प्रक्रियेत झाडे ग्लुकोज तोडतात आणि किंचित प्रमाणात कार्बन डायऑक्साइड सोडतात.
advertisement
पण सत्य काय आहे? : अनेक अभ्यासातून दिसून आले आहे की, ही कार्बन डायऑक्साइडची मात्रा माणसांनी सोडलेल्या CO2 च्या तुलनेत काहीच नाही. उदाहरणार्थ, रात्रीच्या वेळी एका झाडाने सोडलेल्या CO2 चे प्रमाण एका मानवी श्वासापेक्षा (single human breath) खूप कमी असते. त्यामुळे, बेडरूममध्ये झाडे ठेवणे आरोग्यासाठी धोकादायक नाही, उलट ते हानिकारक वायू शोषून घेऊन हवामान ताजे ठेवते.
advertisement
advertisement