ख्रिसमससाठी घरीच बनवा खास चॉकलेट, सोपी रेसिपी माहितीये का?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
दरवेळेस चॉकलेट विकत घेऊन देण्यापेक्षा आपण हे चॉकलेट घरी अगदी पाच मिनिटात तयार करू शकतो.
चॉकलेट खायला हे सर्वांना आवडतं. अगदी लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने चॉकलेट खात असतात. आता ख्रिसमस येतोय त्यानंतर नवीन वर्ष आहे तर त्यासाठी तुम्हाला जर कोणाला काहीतरी गिफ्ट द्यायचं असेल तर चॉकलेट हा बेस्ट पर्याय नेहमीच असतो. दरवेळेस चॉकलेट विकत घेऊन देण्यापेक्षा आपण हे चॉकलेट घरी अगदी पाच मिनिटात तयार करू शकतो. तर होममेड चॉकलेट घरी कसे तयार करायचे याची रेसिपी छत्रपती संभाजीनगर येथील गृहिणी श्रुती क्षीरसागर सांगितली आहे.
advertisement
होममेड चॉकलेट तयार करण्यासाठी सर्वप्रथम 50 ग्रॅम डार्क कंपाऊंड घ्यायचे. त्याचबरोबर 50 ग्राम चॉकलेट घ्यायचे. तुम्ही फिफ्टी-फिफ्टी दोन्ही घेऊ शकता. त्यानंतर हे चॉकलेट छान बारीक चॉप करून घ्यायचे. आणि त्यांना मेल्ट करून घ्यायचं. तुम्ही त्यासाठी डबल बॉयलर मेथड पद्धत सुद्धा वापर करू शकता. चॉकलेट मेल्ट झाल्यानंतर त्याला मिक्स करून घ्यायचं. चॉकलेट एकदा मेल्ट झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार चॉकलेट तयार करू शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ओरिओ बिस्कीटचे चॉकलेट तयार करण्यासाठी आपण जे व्हाईट चॉकलेट मेल्ट केलेला आहे. त्या चॉकलेटमध्ये ओरिओ बिस्कीट हाताने क्रश करून टाकून द्यायचं. त्यानंतर डार्क कंपाऊंड जे आपण मेल्ट केलेला आहे. सर्वप्रथम मोल्डमध्ये एक लेयर डार्क कंपाऊंड चॉकलेट टाकायची. त्यानंतर ओरिओचं मिश्रण त्याच्यात टाकायचं आणि वरतून परत एकदा त्यामध्ये डार्क कंपाऊंड टाकायचं आणि सेट होण्याकरिता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं अगदी तुम्ही पाच ते दहा मिनिटांमध्ये हे सर्व चॉकलेट घरच्या घरी तयार करू शकता, असं श्रुती क्षीरसागर यांनी सांगितलं.