Pune : 'प्रियंका घरी परत ये...', पतीच्या गोड बोलण्याला भाळली अन् भयानक घडलं, पुणे हादरलं
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
माहेरी असलेल्या पत्नीला गोड बोलून घरी बोलवून घेतलं आणि त्यानंतर तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे.
पुणे : मुल होत नसल्यामुळे पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. पुण्याच्या हडपसरमधील भेकराई नगर भागात राहणाऱ्या जोडप्यामध्ये मुल नसल्यामुळे अनेकदा वाद व्हायचे. या वादाने शुक्रवारी टोक गाठलं आणि पतीने घरामध्येच पत्नीची गळा घोटून हत्या केली. आकाश विष्णू दोडके (वय 35) असं आरोपी पतीचं नाव आहे. आरोपी आकाशने त्याची पत्नी प्रियंका आकाश दोडके (वय 27) हिची राहत्या घरी हत्या केली.
पत्नीची हत्या केल्यानंतर पती लगेच जवळच्या पोलीस स्टेशनला गेला आणि आपण पत्नीचा खून केल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. यानंतर फुरसुंगी पोलिसांनी आरोपी पतीला तातडीने ताब्यात घेतले आणि घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना घरात महिलेचा मृतदेह आढळला. यानंतर पोलिसांनी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच केस आणखी मजबूत करण्यासाठी पोलीस जबाबाच्या नोंदी करत आहेत. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
advertisement
प्रियंका आणि आकाश दोडके यांचं लग्न 18 फेब्रुवारी 2018 रोजी झालं होतं, पण लग्नाच्या सात-आठ वर्षांनंतरही दोघांना मुल होत नव्हतं, तसंच आकाश हा वारंवार प्रियंकाच्या चारित्र्यावरही संशय घेत होता. तसंच प्रियंकाला मारहाणही करत होता. प्रियंकाने याबाबत तिच्या माहेरीही कल्पना दिली होती. पती वारंवार त्रास देत असल्यामुळे प्रियंका तीन वर्षांपासून दौंडमध्ये तिच्या भावाच्या घरी राहत होती.
advertisement
आठवड्याभरापूर्वी आकाशने प्रियंकाला फोन करून पुन्हा एकत्र राहण्यासाठी लाडीगोडी लावली. यानंतर प्रियंका पुन्हा पतीसोबत राहायला आली. यानंतर आकाशने प्रियंकाची गळा दाबून हत्या केली. आरोपी आकाश दोडके हा ड्रायव्हर म्हणून काम करतो.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 28, 2025 7:26 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune : 'प्रियंका घरी परत ये...', पतीच्या गोड बोलण्याला भाळली अन् भयानक घडलं, पुणे हादरलं










