Gautami Patil: 'माझ्यासोबत जे काही घडलं...', गौतमी पाटीलने सांगितलं होणारा नवरा कसा असावा, लग्नाच्या अटी ऐकून व्हाल शॉक
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
advertisement
सोशल मीडियापासून ते रुपेरी पडद्यापर्यंत मजल मारणाऱ्या गौतमीच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे, पण तिच्या खाजगी आयुष्यात नक्की काय सुरू आहे? गौतमी लग्न कधी करणार? आणि तिचा होणारा नवरा नक्की कसा असावा? या प्रश्नांनी तिच्या चाहत्यांना नेहमीच भंडावून सोडलं होतं. अखेर गौतमीने या सर्व प्रश्नांची उत्तरं अत्यंत दिलखुलासपणे दिली आहेत.
advertisement
advertisement
गौतमी म्हणाली, "कोणत्याही मुलीला वाटतं तसंच मलाही वाटतं की, माझा जोडीदार मला समजून घेणारा असावा. पण माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मी ज्या क्षेत्रात काम करते, त्याचा त्याने आदर करायला हवा. आजवर माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी घडल्या, चांगले-वाईट प्रसंग आले; हे सर्व स्वीकारून जो माझ्यासोबत खंबीरपणे उभा राहील, तोच माझा जोडीदार असेल."
advertisement
advertisement
advertisement






