advertisement

Rinku Singh : ' मुलाची ताकद फक्त वडिलांसाठी....', वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रिंकु सिंगच्या भावी पत्नीची भावुक पोस्ट चर्चेत!

Last Updated:

Priya Saroj Post For Rinku Singh : रिंकु सिंग याच्या वडिलांचं वर्ल्ड कप सुरू असताना निधन झालं. अशातच आता वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रिंकुची होणारी पत्नी प्रिया सरोज हिने भावनिक पोस्ट लिहिली आहे.

Priya Saroj Post For future husband Rinku Singh after winning
Priya Saroj Post For future husband Rinku Singh after winning
Rinku Singh winning T20 World Cup 2026 : न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे. कुणा एकाच्या हिंमतीवर टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला नसून संघिक कामगिरी महत्त्वाची ठरली. टीम इंडियासाठी हा वर्ल्ड कप भावनिक देखील ठरला. टीम इंडियाचा स्टार खेळाडू रिंकु सिंग याच्या वडिलांचं वर्ल्ड कप सुरू असताना निधन झालं. अशातच आता वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रिंकुची होणारी पत्नी प्रिया सरोज हिने भावनिक पोस्ट लिहिली आहे.

काय म्हणाली प्रिया सरोज?

काही दिवस शाईने लिहिलेले असतात, पण 8 मार्चसारखे दिवस इतिहासात कायमचा कोरला गेला आहे. हा दिवस टीम इंडियाने आयसीसी टी-20 वर्ल्ड कप जिंकला, प्रत्येक भारतीयाचे हृदय अभिमानाने भरून गेलंय. हा क्षण हा देश पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवेल आणि साजरा करेल, असं प्रिया सरोज म्हणाली.
advertisement

मी एका मुलाची ताकद...

टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयादरम्यान, मी एका मुलाची ताकद देखील पाहिली जो त्याच्या वडिलांसाठी, त्याच्या संघासाठी आणि त्याच्या देशासाठी खंबीरपणे उभा राहिला. आयुष्यातील सर्वात कठीण क्षणांमध्येही मैदानावर उतरणं आणि विजेता बनणं हे खरोखरच धाडसी कृत्य आहे, असंही प्रिया सरोज म्हणली.

रिंकूने टीमची साथ सोडली नाही

advertisement
दरम्यान, टीम इंडिया आणि रिंकु सिंगचं अभिनंदन, ज्यांनी जगाला खरी ताकद काय असते हे दाखवून दिलं, असं म्हणत प्रिया सरोजने भावना व्यक्त केल्या. रिंकु सिंग याला प्लेइंग इलेव्हनमध्ये अखेरच्या सामन्यात संधी मिळाली नाही. पण रिंकूने टीमची साथ सोडली नाही. घरात दु:ख असताना देखील तो मैदानात थांबला अन् टीम इंडियाला अखेरच्या सामन्यापर्यंत साथ दिली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rinku Singh : ' मुलाची ताकद फक्त वडिलांसाठी....', वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रिंकु सिंगच्या भावी पत्नीची भावुक पोस्ट चर्चेत!
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement