सिमेंट मिक्सर अंगावरून गेला, पुण्यात तरुणीचा चिरडून मृत्यू, धडकी भरवणारा CCTV VIDEO
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Pimpri Chinchwad Accident: पुणे शहरालगत असलेल्या सुसगाव परिसरात मंगळवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडला. सिमेंट मिक्सरच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे.
गोविंद वाकडे, प्रतिनिधी पिंपरी चिंचवड: पुणे शहरालगत असलेल्या सुसगाव परिसरात मंगळवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडला. सुस-नांदे रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका आरएमसी (Ready Mix Concrete) ट्रकने दुचाकीला धडक दिली, ज्यामध्ये १८ वर्षीय तरुणीचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. अंजली शंकर साळवे असं मृत पावलेल्या तरुणीचं नाव आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अंजली साळवे ही आपल्या दुचाकीवरून सुस-नांदे रोडने जात होती. ती शिवबा चौकाजवळ आली असता, पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका सिमेंट मिक्सरने तिला जोरदार धडक दिली. धडक लागताच अंजलीचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि ती खाली पडली. दुर्दैवाने, ती थेट ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघात बघणाऱ्यांचा काळजाचा थरकाप उडाला.
advertisement
ट्रक चालकासह मालकावरही गुन्हा दाखल
या प्रकरणी बावधन पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्परतेने कारवाई केली आहे. पोलिसांनी ट्रक चालक राजपाल कसबे याला तातडीने अटक केली आहे. विशेष म्हणजे, केवळ चालकावर कारवाई करून न थांबता, सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी 'सूर्या कन्स्ट्रक्शन'चे मालक गणेश कलशेट्टी यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी चिंचवडच्या सुसगाव परिसरात मंगळवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडला. तरुणीचा जागीच मृत्यू... pic.twitter.com/o6oeHsJnv8
— News18 Marathi (@News18_marathi) March 10, 2026
advertisement
अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ
या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओत तरुणी दुचाकीवरून जाताना दिसत आहे. निमुळता रस्ता असल्याने सुरुवातीला तिला सिमेंट मिक्सरचा धक्का बसला. यानंतर तरुणीचं नियंत्रण सुटलं आणि ती थेट सिमेंट मिक्सरखाली आली. या गाडीचा वेग अधिक असल्याने मिक्सरने तरुणीला काही अंतर चिरडत नेलं. या दुर्दैवी अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Location :
Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
First Published :
Mar 10, 2026 9:22 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
सिमेंट मिक्सर अंगावरून गेला, पुण्यात तरुणीचा चिरडून मृत्यू, धडकी भरवणारा CCTV VIDEO










