advertisement

Summer Recipe : उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा, घरीच बनवा चना डाळ आणि दह्याची चटणी, संपूर्ण रेसिपी

Last Updated:
चना डाळ आणि दह्याची चटणी हा तुमच्यासाठी अगदी परफेक्ट पर्याय ठरू शकतो. घरगुती साहित्य वापरून कमी वेळात तयार होणारी ही चटणी चवदार तर आहेच, पण उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्याचं कामही करते.
1/7
उन्हाळ्याच्या दिवसांत हलकं, थंड आणि चटपटीत काहीतरी खायची इच्छा वारंवार होते. अशावेळी रोजच्या पदार्थांऐवजी काहीतरी वेगळं आणि पटकन तयार होणारं बनवायचं असेल, तर चना डाळ आणि दह्याची चटणी हा तुमच्यासाठी अगदी परफेक्ट पर्याय ठरू शकतो. घरगुती साहित्य वापरून कमी वेळात तयार होणारी ही चटणी चवदार तर आहेच, पण उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्याचं कामही करते.

2/7
उन्हाळा सुरू झाला की आहारात थंड पदार्थांचा समावेश करणं आवश्यक ठरतं. दही, ताक, मठ्ठा यांसारखे पदार्थ आपण नेहमी खातोच. मात्र त्याच त्या चवीला कंटाळा आला असेल आणि जेवणात काहीतरी वेगळं, झटपट आणि चटपटीत हवं असेल, तर ही खास चटणी नक्की करून पाहावी. अमरावतीच्या वृषाली भुजाडे यांनी सांगितलेली ही रेसिपी अगदी सोपी असून प्रत्येक घरात सहज तयार होऊ शकते.

3/7
चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य : सुमारे 4 ते 5 तास भिजवून ठेवलेली चना डाळ, ताजं दही, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, जिरे, हळद, मीठ, तेल, कडीपत्ता आणि मोहरी. हे सर्व साहित्य साधारणपणे प्रत्येक घरात उपलब्ध असतं, त्यामुळे ही चटणी बनवणं अजून सोपं होतं.

4/7
चटणी बनवण्याची कृती : सर्वप्रथम भिजवून घेतलेली चना डाळ आणि दही एकत्र करून मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्यायचं. या मिश्रणात पाणी अजिबात घालू नये, त्यामुळे चटणीला योग्य घट्टपणा येतो. हे मिश्रण एकजीव झाल्यावर ते एका भांड्यात काढून बाजूला ठेवावं. यानंतर कढईत तेल गरम करावं. तेल चांगलं तापल्यावर त्यात मोहरी टाकावी.

5/7
मोहरी तडतडली की जिरे आणि कडीपत्ता घालावा. त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकून थोडं परतून घ्यावं. पुढे हळद आणि मीठ घालून छानसा सुगंधी तडका तयार करून घ्यावा. तयार झालेला हा गरमागरम तडका लगेचच डाळ-दह्याच्या मिश्रणात टाकावा आणि सर्व मिश्रण नीट एकत्र करावं. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करावं.

6/7
अशी ही चविष्ट, ताजी आणि थंडावा देणारी चना डाळ आणि दह्याची चटणी तयार होते. ही चटणी भाकरी, पोळी किंवा साध्या वरण-भातासोबतही छान लागते. विशेष म्हणजे ही चटणी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे अचानक पाहुणे आले तरीही हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

7/7
मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, ती म्हणजे ही चटणी जास्त वेळ साठवून ठेवू नये. उन्हाळ्यात उष्णतेमुळे तिची चव बदलू शकते. त्यामुळे जेवणाच्या थोड्या वेळ आधीच ती तयार करून लगेच खाणं अधिक योग्य ठरतं. एकूणच, कमी वेळात, कमी साहित्यामध्ये आणि उत्तम चवीची ही चटणी उन्हाळ्यातील जेवणाला एक वेगळीच चव देणारी ठरते. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात ही खास रेसिपी नक्की ट्राय करून पाहा.

Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement